
ठाणे – देवदर्शन करून आंबिवली येथील अटाळी गावात परतणार्या भाविकांच्या बसवर इराणी वस्तीतील काही जणांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या आक्रमणात दुर्वेश पाटील हे गंभीररित्या घायाळ झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. तक्रारदार रंजना पाटील यांच्या म्हणण्यानुसार बसला ओलांडून एका दुचाकीस्वाराने धोकादायक वळण घेतल्यानंतर हा वाद झाला. त्यानंतर मुंढा नावाच्या तरुणासह १० महिला-पुरुष यांनी बसमधील नागरिकांवर दगडफेक केली. यात कविता पाटील आणि सुवर्णा पाटील याही घायाळ झाल्या आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला असून सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे आरोपींचा शोध चालू केला आहे.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !