हरियाणातील इंडियन नॅशनल लोक दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय सिंह चौटाला यांचे विधान

चंडीगड – श्रीलंका आणि बांगलादेश येथील तरुणांनी सरकारला देश सोडण्यास भाग पाडले. नेपाळमधील तरुणांनीही हाच कित्ता गिरवला आणि सरकार उलथवून लावले. अशाच प्रकारची रणनीती भारतात आखून विद्यमान सरकार उलथवून लावण्याची आवश्यकता आहे, असे चिथावणीखोर विधान हरियाणातील इंडियन नॅशनल लोक दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय सिंह चौटाला यांनी केले. चौटाला यांचा हरियाणातील एका कार्यक्रमा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात त्यांनी वरील हे विधान केले आहे.
🚨 Call for Chaos, Not Democracy! 🇮🇳
“Like Sri Lanka & Bangladesh, India needs an agitation to overthrow the govt” – Abhay Singh Chautala (INLD).
This is a direct threat to India’s constitutional order & democracy, says BJP.
🛑 Free speech cannot be a shield for anti-national… pic.twitter.com/ePF7pyQ3pw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 4, 2026
हे विधान भारताची राज्यघटनात्मक व्यवस्था आणि लोकशाही नियम यांसाठी धोका ! – भाजप

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी चौटाला यांच्या विधानाचा विरोध करतांना म्हटले की, हे विधान भारताची राज्यघटनात्मक व्यवस्था आणि लोकशाही नियम यांसाठी धोका आहे. हे विधान म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या विरोधातील कृत्य आहे. राष्ट्रीय हितापेक्षाही स्वतःच्या हिताला काही लोक प्राधान्य देत आहेत.
संपादकीय भूमिकाअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा प्रकारचे देशद्रोही विधान करणार्यांना तात्काळ अटक करून कारागृहात डांबले पाहिजे ! |
Obesity Among Children : युरोपीय देशांप्रमाणे भारतातील मुलांमध्ये वाढत आहे लठ्ठपणाचा धोका !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin