‘केरळच्या राजकारणातील पी.सी. जॉर्ज ते व्ही.एस्. अच्युतानंदन् यांच्यापर्यंत इस्लामी प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्या आवाजांविषयी असहिष्णुता वाढत आहे. देशात हत्या, चोरी, दरोडे, बलात्कार आणि मालमत्तेची नासधूस यांसह गुन्हे होतच रहाणार आहेत. ‘या घटनांपासून मुक्त’, असे जगात कोणतेही देश नाहीत. गुन्हेगारी कारवायांची संख्या देशानुसार पालटते; पण गुन्हे, मारेकरी, बलात्कारी आणि चोर जगभरात वाढत आहेत, हे सत्य आहे. जगभरातील कायदा आणि कार्यवाही करणार्या संस्था या अटकेतील गुन्हेगार्यांचा तपशील उघड करण्यास अजिबात संकोच करत नाहीत.
(पूर्वार्ध)

१. कुठल्याही प्रकरणातील मुसलमान आरोपींची नावे उघड न करणारे केरळ राज्य !
दक्षिणेकडील केरळ राज्यात जर गुन्हेगार अल्पसंख्य समुदायाचे असतील, तर तेथील वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या आणि नियतकालिके त्यांची नावे कधीही प्रसिद्ध करत नाहीत. मुसलमान आरोपींची नावे ते कधीही उघड करत नाहीत.
२. मुसलमान किंवा ख्रिस्ती यांनी गुन्हे केल्यास त्यांचा निषेध न करणारे केरळ सरकार !
मुख्यमंत्री, त्यांचे मंत्रीमंडळ, तसेच तथाकथित धर्मनिरपेक्षतावाले हे सर्व जण केवळ हिंदूंना फटकारतात. मुसलमान किंवा ख्रिस्ती समुदायाच्या सदस्यांनी गुन्हे केल्यास ते त्यांचा निषेध करत नाहीत. मुसलमान गुन्हेगारांच्या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित करण्याचे धाडस करणारे राजकीय नेते केरळच्या सामाजिक जीवनापासून स्वतःला दूर ठेवतात.
सलग ७ वेळा विधासभेत आमदार म्हणून निवडून आलेले धर्मनिष्ठ ख्रिस्ती नेते पी.सी. जॉर्ज यांनी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आवाज उठवल्यावर ८ व्या निवडणुकीत त्यांचा पराभव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डावी लोकशाही आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगाभी आघाडी यांनी केला. जॉर्ज यांचा गुन्हा काय होता, तर ते लव्ह जिहादच्या विरोधात उघडपणे बोलत होते. जॉर्ज हे राज्यातील ख्रिस्त्यांची राजकीय शाखा असलेल्या केरळ काँग्रेसचेही नेते होते. स्वतःच्याच पक्षाच्या नेत्यांचा ढोंगीपणा आणि दुटप्पीपणा यांविरोधातही ते उघडपणे बोलतात.
३. लव्ह जिहादच्या विरोधात तडजोड न करण्याचा पवित्रा घेतल्याने पी.सी. जॉर्ज यांनी पद गमावले !

केरळ काँग्रेसने त्यांना कधीही मंत्रीपद दिले नसले, तरी जॉर्ज हे केरळच्या विधानसभेतील उत्कृष्ट विधीमंडळ सदस्य होते. इस्लामी मूलतत्त्ववाद्यांच्या ‘लव्ह जिहाद’ विरोधात त्यांचा तडजोड न करण्याचा पवित्रा होता. यामुळे सहस्रो हिंदु आणि ख्रिस्ती मुलींचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचले. यामुळे इतर राजकीय पक्षांचे ते नावडते ठरले. त्यांनी ‘ख्रिस्त्यांकडे दुर्लक्ष करून मुसलमानांचे लांगूलचालन करणारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस यांच्यात चढाओढ लागली आहे’, असे स्पष्टपणे सांगितले. याखेरीज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांतील विकासाविषयीच्या नियोजनाची त्यांनी बेधडकपणे स्तुती केली. यामुळे मुसलमान, मार्क्सवादी, तसेच ख्रिस्त्यांचा एक गट यांना राग आला. याचा परिणाम काय झाला? सर्व धार्मिक मूलतत्त्ववादी आणि अन्य लोक यांनी एकत्र येऊन वर्ष २०२१ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी कंबर कसली.
४. मुसलमानांच्या विरोधात भूमिका मांडल्याने तत्कालीन मुख्यमंत्री व्ही.एस्. अच्युतानंदन् यांनी सत्ताच गमावली !
जुलै २०२५ मध्ये वयाच्या १०२ व्या वर्षी निधन पावलेले माजी मुख्यमंत्री व्ही. एस्. अच्युतानंदन् या आणखी एक राजकीय नेत्याला स्वतःचे मत व्यक्त करण्याच्या ‘गुन्ह्या’मुळे मुसलमानांच्या रोषाला सामोरे जावे लागेले. मुख्यमंत्री असतांना नवी देहली येथे पत्रकार परिषदेत अच्यतानंदन् यांनी ‘लव्ह जिहाद’ आणि राज्यातील लोकसंख्येत अनियंत्रित वाढ, यांसाठी मुसलमानांवर टीका केली. सरकारने निश्चित केलेल्या २ मुलांचा नियमाचा मुसलमानांनी तिरस्कार केल्याविषयी त्यांनी जोरदार टीका केली. वर्ष २०१० मध्ये अच्युतानंदन् यांनी ‘मुसलमानांचा हेतू स्पष्ट आहे; कारण ते केरळ राज्याचे इस्लामीकरण करू इच्छितात’, असे विधान करून देशभर खळबळ उडवून दिली होती. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने वर्ष २०१० मध्ये महंमद पैगंबर यांचा अपमान केल्याचा सूड म्हणून प्रा. टी.जे. जोसेफ यांचा हात तोडल्याविषयी त्यांच्या विरोधात उघडपणे बोलणारे ते एकमेव भाजपेतर नेते होते.
वर्ष २०११ मधील विधानसभा निवडणुकीत डाव्या लोकशाही आघाडीचे नेतृत्व करणारे अच्युतानंदन् यांना सत्ता टिकवता आली नाही आणि ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडी अन् काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी याच्याकडून थोड्या मतांनी पराभूत झाले. डाव्या लोकशाही आघाडीला मतदान झाले असले तरी, सामान्य माणसांशी संबंधित सर्व सूत्रे उपस्थित करत अच्युतानंदन् हे केरळच्या राजकारणातील अव्वल क्रमांकाचे नेते होते.
५. अच्युतानंदन् यांच्यामुळे निवडणुकीत विजय मिळूनही साम्यवाद्यांकडून पिनराई विजयन् यांना मुख्यमंत्रीपद !
व्ही.एस्. अच्युतानंदन् यांच्या लोकप्रियतेमुळे वर्ष २०१६ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत डाव्या लोकशाही आघाडीला पुन्हा सत्ता मिळवण्यास साहाय्य झाले. निवडणुकीतील विजयानंतर संपूर्ण केरळ राज्यात अच्युतानंदन् यांची मोठ्या आकाराचे फलक (होर्डिंग्ज) झळकले. तथापि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालीन सचिव सीताराम येच्युरी यांनी पत्रकार परिषदेत पिनराई विजयन् यांना मुख्यमंत्री बनवण्याची घोषणा केली ! यावर संपूर्ण देशभरात ‘अच्युतानंदन् यांनी सामना जिंकला; परंतु विजयन् यांनी चषक हिसकावून घेतला’, अशा शब्दांत माकप आणि त्यांचे नेते यांच्यावर टीका केली.
६. मुसलमानांच्या विरोधात आवाज उठवल्याने अच्युतानंदन् यांची पक्षांतर्गत निर्णय घेणार्या सर्वोच्च गटातूनही हकालपट्टी !
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने अच्युतानंदन् यांना पक्षांतर्गत निर्णय घेणार्या सर्वोच्च गटातून, म्हणजे ‘पॉलिट ब्युरो’मधून काढून टाकले. यामगचे आणि त्यांना दुसर्यांदा मुख्यमंत्रीपद न देण्यामगाचे कारण काय होते? ज्यांचे दुष्ट डावपेच अच्युतानंदन् यांनी उघड केले, त्या धर्मांधांचा त्यांच्या विरोधात संताप होता. ‘राज्यात लव्ह जिहाद मोठ्या प्रमाणात आहे’, या केरळ उच्च न्यायालयाच्या विधानाचे त्यांनी समर्थन केले होते. येच्युरी, विजयन्, राज्य सचिव बालकृष्णन्, पक्षाचे माजी प्रमुख प्रकाश करात, वृंदा करात आणि चेन्नईतील इंग्रजी वृत्तपत्राच्या मालकाचा समावेश असलेल्या माकपच्या नेतृत्वाने अच्युतानंदन् यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचे डावपेच आखले. ‘अच्युतानंदन् यांनी त्यांच्या मनातील गोष्ट (लव्ह जिहादविषयी) बोलले आणि त्यांना त्याची किंमत चुकवावी लागली’, हे यावरून लाक्षात येते.

७. मराड गावात ८ हिंदूंच्या हत्येची चौकशी करण्याविषयी ए.के. अँथनी यांनी आग्रह धरल्याने इतर नेत्यांचा रोष !
वर्ष २००४ मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए.के. अँथनी यांची मुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली. अँथनी यांना मुख्यमंत्रीपदावरून का हटवण्यात आले ?, हे राज्यातील सामान्य लोकांसाठी आजही एक रहस्यच आहे; परंतु ते आणि ‘मुस्लिम लीग’चे प्रमुख पी.के. कुन्हालीकुट्टी यांच्यातील शाब्दिक द्वंद्वामुळे अँथनी यांची हकालपट्टी करण्यात आली. कोझीकोड जिल्ह्यातील मराड गावात २ मे २००३ या दिवशी ८ हिंदु मासेमार अरबी समुद्रात मासेमारीसाठी निघाले, तेव्हा इस्लामी आतंकवाद्यांनी त्यांच्यावर आक्रमण करून त्या सर्वांची हत्या केली. या आक्रमणाचे धागेदोरे मशिदीपर्यंत पोचले; पण काहीही झाले नाही. राज्य पोलिसांच्या अन्वेषणाने हिंदूंचे समाधान झाले नाही. विविध हिंदु संघटनांनी या हत्याकांडाची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्याची मागणी केली; परंतु त्यास ‘मुस्लिम लीग’ने तीव्र विरोध दर्शवला. यामुळे अँथनी आणि इतर धर्मनिरपेक्ष नेते यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला.
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– श्री. कुमार चेल्लप्पन, ज्येष्ठ पत्रकार, केरळ.
उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/993137.html
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !