‘संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगा’ने (‘यू.एन्.एच्.आर्.सी.’ने) आयोजित केलेल्या ‘अल्पसंख्यांक समस्यांवरील मंचाच्या’ १८ व्या सत्रात बोलतांना बांगलादेशी हिंदु हक्क कार्यकर्ते दीपन मित्रा यांनी इस्लामवाद्यांनी बांगलादेशी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांच्या घटनांवर प्रकाश टाकला. याविषयीची सूत्रे येथे देत आहोत. २९ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदूंची हत्या, बलात्कार आणि महिलांचे बळजोरीने धर्मांतर, बांगलादेशामधील हिंदूंना नोकरीवरून हटवण्याची चळवळ अन् बांगलादेशात अल्पसंख्यांकांना अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार नाही’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा उत्तरार्ध प्रसिद्ध करत आहोत.
(उत्तरार्ध)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/991690.html

५. स्वतंत्रपणे विचार मांडणारे आणि ‘ब्लॉगर्स’ यांच्या हत्या
‘मानवाधिकार आणि न्याय विभागा’च्या विश्लेषणानुसार वर्ष २०१३ पासून बांगलादेशात आतंकवाद्यांनी अनेक धर्मनिरपेक्ष नास्तिक, लेखक, ब्लॉगर्स (संकेतस्थळावर लेख लिहिणारे लेखक) आणि प्रकाशक यांना ठार मारले आहे किंवा गंभीर घायाळ केले आहे. वर्ष २०२३ मध्ये आतापर्यंत न्यूनतम १२ स्वतंत्र विचार मांडणारे आणि ‘ब्लॉगर्स’ यांची हत्या केली. शेकडो धर्मनिरपेक्ष नास्तिक, लेखक आणि ब्लॉगर्स स्वतःचा जीव वाचवण्यासाठी देश सोडून विदेशात पळून गेले.

६. बनावट (खोट्या) चकमक प्रकरणात चिन्मय कृष्ण दास प्रभु यांना अटक
चिन्मय कृष्ण दास हे ‘इस्कॉन’चे साधू, बांगलादेशाच्या ‘सनातन जागरण मंचा’चे प्रवक्ते आणि चटगांव येथील ‘पुंडरीक धाम’चे प्रमुखही आहेत. संशयास्पद आणि ‘देशद्रोहाच्या’ खोट्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. खरेतर ते हिंदूंच्या हक्कांसाठी आणि देशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवत होते; म्हणून त्यांना लक्ष्य करण्यात आले. इस्कॉनचे एक निर्दोष साधू चिन्मय कृष्ण दास प्रभु यांना कोणत्याही आरोपांविना १ वर्ष कारागृहात ठेवण्यात आले आहे. अल्पसंख्यांक हिंदु आणि बौद्ध यांच्यावरील अत्याचारांचा निषेध करणे, हा त्यांचा एकमेव ‘गुन्हा’ होता. बांगलादेशात मुसलमानेतरांना स्थान नाही. गेल्या वर्षभरात शेकडो मठ आणि धार्मिक स्थळांवर आक्रमणे करण्यासह तोडफोड करण्यात आली अन् आग लावण्यात आली.
२३ जानेवारी २०२५ या दिवशी ‘जागतिक सुफी संघटने’ने ‘राष्ट्रीय प्रेस क्लब’मध्ये पत्रकार परिषद घेतली आणि सांगितले की, ऑगस्ट २०२४ पासून किमान ९९ धार्मिक स्थळांवर आक्रमणे झाली आहेत. दीपन मित्रा यांनी चिन्मय कृष्ण दास प्रभु यांच्या त्वरित आणि बिनशर्त सुटकेची मागणी केली. आंतरराष्ट्रीय समुदाय यापुढे गप्प राहू शकत नाही, यावरही भर देण्यात आला. बांगलादेशातील हिंदु, बौद्ध, ख्रिस्ती आणि आदिवासी अल्पसंख्यांक यांच्या संरक्षणासाठी जगाला पुढे येऊन आवाज उठवावा लागेल, तसेच त्यांचे सामाजिक, राजकीय अन् धार्मिक हक्क यांचे रक्षण करण्यात सक्रीय भूमिका बजावावी लागेल.
बांगलादेशी हिंदूंना वाचवण्यासाठी भारताने पुढाकार घेणे आवश्यक !

भारत सरकारने बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणाविषयी स्वतःचे उत्तरदायित्व टाळण्याऐवजी युनूस राजवटीवर दबाव आणावा आणि हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करायला हवी. भारत आणि भारत सरकार ही आता बांगलादेशी हिंदूंची शेवटची आशा आहे. भारत गप्प राहू शकत नाही. भारताने पुष्कळ उशीर होण्यापूर्वी बांगलादेशी हिंदूंच्या परिस्थितीकडे लक्ष दिले पाहिजे. इस्लामवाद्यांना एकतर सर्व हिंदूंना ठार मारायचे आहे किंवा त्यांचे धर्मांतर करायचे आहे. अफगाणिस्तान एकेकाळी हिंदु देश होता, पाकिस्तानातील हिंदू अजूनही टिकून रहाण्यासाठी धडपडत आहेत आणि आता बांगलादेशही त्याच दिशेने जात आहे. बांगलादेशी हिंदूंना वाचवण्यासाठी भारताने पुढाकार घेतला पाहिजे.
– श्रद्धा पांडे
७. प्रसिद्ध बाऊल (लोकसंगीताचा प्रकार) गायक अबुल सरकार यांना बांगलादेश सरकारकडून अटक
नोव्हेंबर २०२५ मध्ये महंमद युनूस यांच्या अंतरिम सरकारने बांगलादेशाचे प्रसिद्ध बाऊल गायक अबुल सरकारला अटक केली. एका संगीत सादरीकरणाच्या वेळी इस्लाम आणि अल्ला यांच्या विरोधात निंदनीय विधाने केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. मुफ्ती महंमद अब्दुल्ला यांच्या तक्रारीवरून ही अटक करण्यात आली. अबुल सरकार यांना अटक केल्यानंतर न्यायालयाच्या आवाराबाहेर ‘तौहिदी जनता’ आणि ‘आलिम-उल्मा’ यांसारख्या संघटनांशी संबंधित कट्टरपंथी मुसलमानांच्या जमावाने घेरले. ‘एक्ता दूता बाऊल धार, धारा धारा जाबा कर’ (प्रत्येक बाऊलला पकडा आणि मारा) यांसारख्या घोषणा माणिकगंजच्या रस्त्यांवर प्रतिध्वनीत होत होत्या.
आणखी एक घटना बांगलादेशात वाढणारी इस्लामी धर्मांधता आणि असहिष्णुता स्पष्ट करते. कट्टरतावादी इस्लामी गटांनी १९ व्या शतकातील महान सुफी संत आणि लोक कवी फकीर ललन शाह यांची समाधी पाडण्याची जाहीर धमकी दिली आहे. ललन शाह यांचे तत्त्वज्ञान बर्याच काळापासून या प्रदेशातील सांस्कृतिक सलोख्याचे प्रतीक राहिले आहे.

८. बांगलादेशामधील वाढता आतंकवाद
५ ऑगस्ट २०२४ या दिवशी बांगलादेशातील विविध कारागृहांमधून शेकडो आतंकवादी आणि गुन्हेगार पळून गेले. पळून गेलेल्या कैद्यांपैकी ७० आतंकवाद्यांसह ७०० गुन्हेगारांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आदिवासी (डोंगराळ) जमातींचे उच्चाटन करण्याच्या विषयावर काम करणार्या इस्लामी अहवालात असेही निदर्शनास आले आहे की, इस्लामी जिहादी आणि बांगलादेशी सैन्य आदिवासी समुदायांना त्यांच्या पूर्वजांच्या भूमीतून हद्दपार करण्याचा प्रयत्न करत आहेत. एका घटनेमध्ये बंगाली मुसलमान वसाहती आणि सैन्याने खागराचारी अन् रंगमती येथील आदिवासी जमातींवर हिंसक आक्रमण केले. या आक्रमणामध्ये ८ आदिवासी मारले गेले आणि १०० हून अधिक घायाळ झाले. दिघिनाला येथील १७५ दुकाने आणि रंगमतीतील किमान २०० लहान अन् मोठ्या व्यवसायांची हानी केली.
इस्लामवाद्यांनी रंगमती येथील ‘चटगांव हिल ट्रॅक्ट्स प्रादेशिक परिषदे’च्या कार्यालयावरही आक्रमण केले आणि ९ चारचाकी वाहने अन् १ मोटरसायकल पेटवली. या व्यतिरिक्त इस्लामवाद्यांनी ‘मैत्री विहार’ या बौद्ध धार्मिक संस्थेची तोडफोड केली आणि लूटमार केली. महंमद युनूस यांना जमात-ए-इस्लामीसह बांगलादेशाला इस्लामी देश बनवायचा आहे.
बांगलादेशातील हिंदूंची स्थिती दिवसागणिक खालावत आहे. युनूस सरकारच्या काळात हिंदू सर्वांत असुरक्षित स्थितीत आहेत. त्यांच्यासाठी भारत ही शेवटची आशा आहे. गेल्या एका वर्षांत कोणत्याही महत्त्वाच्या सरकारी पदावर एकाही हिंदूची नियुक्ती झालेली नाही. इस्लामवादी हे हिंदु आणि इतर धार्मिक अल्पसंख्यांक यांना त्यांच्या धार्मिक ओळखीच्या आधारे लक्ष्य करत आहेत, तर महंमद युनूस वारंवार भारत अन् भारतीय माध्यमांना दोषी ठरवून हिंदूंवरील अत्याचारांना अतिशयोक्ती असल्याचे सांगून फेटाळून लावत आहेत.
युनूस इस्लामवादी गटांच्या संपूर्ण संगनमताने हिंदूंना लक्ष्य करत आहेत. ते पुढच्या वर्षी निवडणुका घेऊ देतील आणि जरी त्यांनी तसे केले, तरी ते जमात-ए-इस्लामी आणि त्याचे सहयोगी सत्तेत येतील, याची खात्री करतील. ‘बांगलादेशाला इस्लामी देश बनवणे’, हे त्यांचे उद्दिष्ट आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीगवर पुढील निवडणुकीत बंदी घातल्यानंतर अंतरिम सरकारचे सल्लागार आता ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ला (‘बी.एन्.पी.’ला) सत्तेच्या शर्यतीतून वगळण्याचा प्रयत्न करत आहेत.
– श्रद्धा पांडे
(साभार : ‘ऑपइंडिया’चे संकेतस्थळ)
Obesity Among Children : युरोपीय देशांप्रमाणे भारतातील मुलांमध्ये वाढत आहे लठ्ठपणाचा धोका !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !
(म्हणे) ‘मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्यास भारतावर टीका करण्यास मागेपुढे पहाणार नाही !’ – US Lawmakers