
काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानला मिळणार्या आंतरराष्ट्रीय निधीत मोठी कपात झाली आहे. अमेरिका आणि इतर देश यांनी साहाय्याचा हात आखडता घेतल्यामुळे ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ सारख्या संस्था हतबल झाल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न कार्यक्रमाने दिलेल्या चेतावणीवरून असे समजते की, या हिवाळ्यात तब्बल १ कोटी ७० लाख अफगाणी नागरिकांना तीव्र उपासमारीचा सामना करावा लागत आहे. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० लाखांनी वाढली आहे.
🚨 Afghanistan Facing Hunger Crisis 🚨
😔 17 million Afghan citizens are facing severe starvation today.
Under the rule of the extremist Taliban government in Afghanistan, even as Muslims are dying of hunger; has a single Islamic country stepped forward to help?
⚖️ Contrast… pic.twitter.com/bjcDGvUZGl
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 29, 2025
१. ‘आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समिती’च्या ताज्या अहवालानुसार वर्ष २०२५ मध्ये अफगाणिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी अर्ध्याहून अधिक लोक, म्हणजेच अनुमाने २ कोटी २९ लाख लोक केवळ साहाय्याच्या आशेवर जगत आहेत.
२. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाली आहे की, हिवाळ्यात होणारे अन्न वाटप जवळपास ठप्प झाले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ष २०२४ मध्ये जिथे ५६ लाख लोकांना साहाय्य मिळत होते, तिथे वर्ष २०२५ मध्ये केवळ १० लाख लोकांपर्यंतच अन्न पोचू शकले आहे. निधीअभावी वर्ष २०२६ मध्ये केवळ ३९ लाख अतीगरजू लोकांवरच लक्ष केंद्रित करावे लागेल, अशी हतबलता संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे.
३. गेल्या ४ वर्षांत ७१ लाख अफगाणी शरणार्थी मायदेशी परतले आहेत. यामुळे देशातील आधीच मर्यादित असलेल्या संसाधनांवर मोठा ताण आला आहे. अशा लाखो लोकांसाठी रहाणे, खाणे आणि उपचार यांची कोणतीही व्यवस्था सध्यातरी उपलब्ध नाही.
४. केवळ राजकीय अस्थिरताच नाही, तर दुष्काळ आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींनीही अफगाणिस्तानचे कंबरडे मोडले आहे. महागाई गगनाला भिडल्याने सामान्य माणसाला साध्या पिठाची गोणी विकत घेणेही अशक्य झाले आहे.
संपादकीय भूमिका
|
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !