
पुणे, २७ डिसेंबर (वार्ता.) – आज महिला सशक्तीकरण होत असून महिला आणि युवती विविध क्षेत्रांत पुढाकार घेऊन कार्यरत असतांना आपल्याला दिसतात. सशक्तीकरणाच्या समवेतच महिलांनी धर्माचरणही केले पाहिजे. महिलांवर होणारे अत्याचार पहाता आजच्या युवतींनी स्वसंरक्षणाची कलाही आत्मसात करावी, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी केले. सोरतापवाडी (पुणे) येथे नुकतेच सौ. आश्लेषा चोरघे यांच्या ‘नृत्य आविष्कार डान्स अकॅडमी’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘डान्स फेस्टिवल – २०२५’मध्ये त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला ‘नुपूर झंकार अकॅडमी’च्या सौ. रूपाली जोशी, ‘सारेगमप’मधील विजेती कार्तिकी गायकवाड उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या आरंभी नटराजाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. अकॅडमीच्या वार्षिक संमेलनानिमित्त विद्यार्थ्यांचे नृत्य सादरीकरण करण्यात आले आणि त्यांना स्मृतीचिन्ह अन् प्रमाणपत्र देण्यात आले.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !