जुन्या गोपनीय कागदपत्रांमधील माहिती उघड

वॉशिंग्टन (अमेरिका) – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांना पाकिस्तानकडे असलेला अणूबाँब चुकीच्या हातात जाण्याची भीती होती. वर्ष २००१ ते २००८ या कालावधीत पुतिन आणि बुश यांच्यामध्ये झालेल्या चर्चेच्या गोपनीय कागदपत्रांमध्ये असलेली ही माहिती आता उघड झाली आहे.
ही कागदपत्रे अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी आर्काइव्ह’ने माहिती अधिकार कायद्यांतर्गत उघड केली आहेत. यासह या कागदपत्रांमध्ये पाकिस्तानचे आतंकवादी जाळे, इराण आणि उत्तर कोरियापर्यंत अणूतंत्रज्ञान पोचण्याचा धोका, तसेच पाकिस्तानची अणूसुरक्षा व्यवस्था, यांविषयी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
दोन्ही नेत्यांना पाकिस्तानातील अंतर्गत परिस्थिती, राजकीय अस्थिरता आणि अणूशस्त्रांविषयी चिंता होती. त्यांना भीती होती की, जर परिस्थिती बिघडली, तर अणूतंत्रज्ञान चुकीच्या हातात जाऊ शकते. वर्ष २००१ ते २००८ या कालावधीत पाकिस्तानची राजवट हुकूमशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या हाती होती. अमेरिकेवर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर आतंकवाद्यांचा शोध घेण्यासाठी अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी पाकिस्तानचे सहकार्य घेतले होते. असे असूनही दोन्ही नेत्यांना पाकिस्तानच्या अणूधोरणावर आणि नियंत्रण प्रणालीवर विश्वास नव्हता.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan