
नवी देहली – बांगलादेशाच्या वायूसेनेच्या लालमोनिरहाट हवाईतळ चीन बांधत आहे. यासोबतच चीन बांगलादेशाच्या पेकुआ येथे ८ पाणबुड्यांसाठीही तळ बांधत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या स्थायी समितीने एक अहवाल सादर केला असून त्यातून ही माहिती समोर आली आहे.
🚨China Establishing Air Force Base and Submarine Base in Bangladesh
Air Force base at Lalmonirhat – just 15 km from India
Submarine base at Pekua – capacity for 8 submarinesThe Lalmonirhat base falls within range of India’s strategic Siliguri Corridor, the only land link to… pic.twitter.com/RCiCSd0rqv
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 19, 2025
१. भारताने बांगलादेशाच्या ‘डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स’च्या अर्थात् सैन्य कारवाईच्या महासंचालकांना याविषयी विचारले असता त्यांनी ‘या धावपट्टीचा सैन्य कारवाईसाठी वापर केला जाणार नाही’, असे स्पष्टीकरण आले. (बांगलादेशाच्या भारतविरोधी कारवाया पहाता यावर कोण विश्वास ठेवणार ? – संपादक)
२. बांगलादेशाच्या नौदलाकडे सध्या २ पाणबुड्या आहेत. बांगलादेशाने याच वर्षी मार्चमध्ये चीनससमेवत सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार बांगलादेशाच्या मोंगला बंदराचा विस्तारही चीन करून देणार आहे.
३. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या स्थायी समितीने म्हटले आहे की, बांगलादेशात चीनसारख्या देशाने पाय रोवणे भारताच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे.
भारतासाठी डोकेदुखी

बांगलादेशचे लालमोनिरहाट येथील वायूदलाचे तळ भारताच्या उत्तरेकडील सीमेपासून १५ किलोमीटर दूर आहे. लालमोनिरहाट तळाच्या कक्षेत भारताचा ‘सिलीगुडी कॉरिडॉर’ येतो. बंगालमध्ये असणारा अन् नेपाळ-बांगलादेश यांच्या सीमांना लागून असणारा अनुमाने २२ किलोमीटर लांबीचा अत्यंत अरुंद भूभाग म्हणजे ‘सिलीगुडी कॉरिडॉर’ होय. ईशान्येकडील ७ राज्यांना उर्वरित भारताशी जोडणारा हा एकमेव भूमार्ग आहे. त्यामुळे हा भारताच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे.
संपादकीय भूमिकाचीन हा पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ या भारताच्या शेजारी देशांमध्ये स्वतःचे अस्तित्व वाढवून भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. बांगलादेश सध्या भारतविरोधी कारवाया करत आहे. त्याला चीनची साथ मिळाली, तर ते भारताच्या सुरक्षेला अधिक धोकादायक ठरणार आहे. हे लक्षात घेऊन भारताने आक्रमक भूमिका घेणे आवश्यक ! |
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !