
सिंधुदुर्ग – देवस्थानांना दानरूपाने मिळणार्या किंवा देवस्थानांद्वारे खरेदी केलेल्या भूमींच्या हस्तांतरण व्यवहारांवर आस्थापने (कंपन्या) किंवा सहकारी संस्था यांप्रमाणे आकारण्यात येणारे मुद्रांक किंवा नोंदणी शुल्क, तसेच सर्व प्रकारचे शुल्क कर पूर्णपणे माफ करण्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री नितेश राणे यांना द्यायचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, मालवण आणि वेंगुर्ला येथील तहसीलदारांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले की, महाराष्ट्र राज्यात असलेली मंदिरे, देवस्थाने, तसेच धार्मिक आणि धर्मदाय संस्था या भक्तांच्या श्रद्धेवर आधारित असून त्या कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता सामाजिक, धार्मिक, धर्मदाय आणि जनसेवा कार्य करत असतात. अनेक श्रद्धाळू भक्त स्वतःच्या श्रद्धेच्या भावनेतून आणि सेवाभावातून मंदिरांना भूमी दानरूपाने प्रदान करतात, तसेच मंदिरांना आवश्यक गोष्टींसाठी (उदा. शेती, भक्तनिवास, पायवाट, पाणीपुरवठा, दिवाबत्ती व्यवस्था आदी) समाजहिताच्या उद्देशाने भूमी खरेदी करावी लागते. अशा भूमींचे हस्तांतरण केवळ धार्मिक, धर्मदाय आणि सामाजिक हितार्थ केले जात असून त्यामध्ये देवस्थानाचा कोणताही आर्थिक लाभ किंवा व्यावसायिक हेतू नसतो. तरीदेखील मंदिरांना प्राप्त होणार्या किंवा मंदिरांनी खरेदी केलेल्या भूमींचे हस्तांतरणाचे मूल्यांकन हे कंपनी आणि सहकारी संस्था यांप्रमाणे करून तसे शुल्क आकारले जाते, जे अनुचित असून भक्तांच्या भावनेचा अनादर करणारे आहे. मंदिरे ही उद्योग, व्यापार किंवा खासगी लाभासाठी नसल्यामुळे अशा भूमींच्या हस्तांतरणावर आकारले जाणारे सद्य:स्थितीतील मुद्रांक शुल्क (स्टँप डुटी), नोंदणी शुल्क (रजिस्ट्रेशन फी), तसेच इतर कर सर्व ठिकाणी पूर्णपणे माफ करण्यात यावेत, जेणेकरून मंदिरांवरील आर्थिक भार न्यून होईल आणि धार्मिक, धर्मदाय अन् सामाजिक कार्य यांना प्रोत्साहन मिळेल.
जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार शिवाजी राठोड, सावंतवाडी येथे नायब तहसीलदार रवींद्र निपाणीकर, मालवण येथे निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर, कुडाळ येथे निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, वेंगुर्ला येथे नायब तहसीलदार क्षितिजा जोशी, देवगड येथे तहसीलदार राजेश पवार आणि कणकवली येथे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी विविध मंदिरांचे विश्वस्त, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सदस्य, सनातन संस्थेचे साधक, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि अन्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार शिवाजी राठोड यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी सुरेश दाभोळकर, परेश साटम आदी उपस्थित होते.
सावंतवाडी येथे नायब तहसीलदार रवींद्र निपाणीकर यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी सर्वश्री भास्कर राऊळ (नेमळे), बाळा डांगी (पारपोली), सखाराम शेर्लेकर (शेर्ले), संपत दळवी (सावंतवाडी) आणि दत्ताराम सावंत (केसरी) यांच्यासह मंदिर महासंघाचे सदस्य उपस्थित होते.
मालवण येथे निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी धर्मप्रेमी संजय गोवेकर, रेवंडी येथील श्री भद्रकाली देवस्थानचे अध्यक्ष युवराज कांबळी, अधिवक्ता पलाश चव्हाण, धर्मप्रेमी महेंद्र पाताडे, देवबाग येथील श्री विठोबा देवालयाचे अध्यक्ष कालिप्रसाद सारंग, मेढा येथील श्री काळबादेवी मंदिराचे विश्वस्त मिलिंद उपाख्य बाबू धुरी, कांदळगाव येथील श्री रामेश्वर देवस्थानचे सचिव संतोष परब, आदी उपस्थित होते.
कुडाळ येथे निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी गोवेरीचे माजी सरपंच दिगंबर नारायण गोवेरकर, बिबवणे येथील श्री. सतीश सामंत-डिंगे, आंदुर्ले-मुणगी येथील श्री. पांडुरंग दिगंबर तेंडोलकर आदी उपस्थित होते.
वेंगुर्ला येथे नायब तहसीलदार क्षितिजा जोशी यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी सर्वश्री सुनील मसुरकर, हर्षद मोर्जे, गोपाळ जुवलेकर, सौ. श्रद्धा जुवलेकर आदी उपस्थित होते.
देवगड येथे तहसीलदार राजेश पवार यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी सनातन संस्थेचे सर्वश्री भास्कर खाडिलकर, अनंत परुळेकर, प्रभाकर कदम, अरुण परब, कौस्तुभ खाडिलकर आदी उपस्थित होते.
कणकवली येथे तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी सर्वश्री सुनील सावंत, जयवंत सामंत, श्रीधर मुसळे, आर्.बी. सावंत, प्रदीप सावंत, मिलिंद पारकर आणि धर्मप्रेमी श्री. दिगंबर पाटील उपस्थित होते.
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी
हवामान खात्याचा नव्हे, तर पंचांगाचा अंदाज खरा ठरला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा सुनील कच्छवे यांनी पदभार स्वीकारला !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !