‘एन्.एम्.एफ्. या युट्यूब वाहिनीचे रोहित पांडे यांनी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांची सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक मुलाखत घेतली. ही मुलाखत ४८ सहस्र जणांनी पाहिली. मुलाखतीत श्री. वर्तक यांनी या महोत्सवाविषयी जी माहिती दिली, ती वाचकांसाठी देत आहोत.

१. कुरुक्षेत्रावर सनातन राष्ट्राचा शंखनाद !
अ. मे २०२५ मध्ये ३० सहस्रांहून अधिक साधक आणि धर्मप्रेमी एकत्र झाले होते. त्याच मंचावरून अशा प्रकारचा भव्य महोत्सव देशाची राजधानी देहलीत येथेही घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. भगवान परशुराम भूमीवर (गोव्याच्या भूमीवर) तेव्हा संकल्प घेतला, तो सत्याच्या स्वरूपात आता साकार होत आहे. ‘संघे शक्ति: कलौयुगे ।’ (कलियुगात संघटित होण्यात शक्ती आहे), असे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे. सनातन संस्थेच्या नेतृत्वात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संघटित होऊन महोत्सवाचे आयोजन केले आहे. रामराज्याच्या स्थापनेचे लक्ष्य ठेवून आम्ही कार्य करत आहोत.
हे वाचा → संपादकीय : ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद कशासाठी ?
आ. एक सांस्कृतिक कार्यक्रम करणे, यासाठी आम्ही एकत्र होत नसून देशाला रामराज्य करणे हा आमचा उद्देश आहे. १०० कोटी हिंदू असूनही आपल्याकडे एकही हिंदु राष्ट्र नाही. त्यामुळे या देशाला हिंदु राष्ट्र (सनातन राष्ट्र) बनवणे, हीच आमची मागणी आहे. हिंदु राष्ट्र किंवा सनातन राष्ट्र वेगळे नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभु श्रीराम यांना अपेक्षित असे राज्यतंत्र भारतात बनले पाहिजे. भारताला सनातन राष्ट्र बनवायचे आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हा संकल्प आहे. त्यासाठी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव होणार आहे.
इ. शंखनाद प्रामुख्याने २ ठिकाणी होतो. आपण देवघरात देवांना आवाहन करण्यासाठी शंख वाजवतो आणि दुसरा शंख कुरुक्षेत्रावर वाजवतो. महाभारताच्या काळात भगवान श्रीकृष्णाने हातात पांचजन्य घेऊन शंख वाजवला होता. त्यांनी वीर सनातनी योद्ध्यांना धर्माच्या बाजूने लढण्यासाठी सिद्ध केले होते. त्यांच्यात क्षात्रतेज जागृत केले होते. आता भारत मंडपम्मध्ये होणारा हा कुरुक्षेत्राचा शंखनाद आहे.
ई. सध्या सामाजिक माध्यमे आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) निर्माण करणे, ही नव्या काळाची शस्त्रे आहेत. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ‘टेरिफ’ नावाचे शस्त्र घेऊन आले आहेत, ते आपली उदयोन्मुख अर्थव्यवस्था थांबवण्यासाठी आहे. अशा शत्रूंशी वैचारिक आणि बौद्धिक मंथनाच्या नंतरच लढले जाऊ शकते. एकप्रकारे हा ‘सनातनी हिंदूंचा महाकुंभ’ भरत आहे.
उ. हिंदूंमध्ये रामराज्याचा आत्मविश्वास निर्माण करणे, हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. जेवढे हिंदूंचे शत्रू आहेत, त्यांचे मनोबल नष्ट करणे, हा दुसरा उद्देश म्हणजे आहे. आपले आत्मबल तर वाढले; पण शत्रूचे मनोबल नष्ट न केल्यास शत्रू आपल्यावर नेहमीच वरचढ राहील; म्हणूनच शत्रूचे मनोबल नष्ट करण्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे.
ऊ. हिंदूच हिंदूंसाठी सर्वांत मोठा धोका आहेत. धर्मांध आतंकवादी आणि ख्रिस्ती धर्मांतर करणारे लोक हे हिंदूंचे शत्रू असू शकतात; पण त्याहूनही मोठे शत्रू या देशात आपल्याप्रमाणे
वेश परिधान केलेले लोक आहेत, जे या देशाचे मीठ खाऊन आत सामान्य नागरिक म्हणून रहातात आणि देशविरोधी कार्य करतात. त्यांच्या विरोधात राष्ट्र्रभक्त लोकांचे संघटनच लढू शकेल.
२. ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शनाची आवश्यकता ! : अमेरिकेत कोणताही व्यक्ती शस्त्र धारण करू शकतो. भारत ही तर आपल्या वीरतेची भूमी आहे. आमच्या घरा-घरातून शस्त्र हटवल्या गेली. हे इंग्रजांचे षड्यंत्र होते. त्यांनी ‘आर्म्स ॲक्ट’ हा कायदा करून लोकांना शस्त्रे ठेवण्यास मनाई केली. दुसरीकडे भारतात जिहाद चालू आहे आणि हिंदू शस्त्रविहीन आहेत; कारण या देशातील चुकीच्या कायद्याने आपल्याला शस्त्रविहीन केले आहे. यापूर्वी महाभारत आणि रामायण काळातही शस्त्रे होती. त्याच प्रकारची शस्त्रे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, म्हणजे १५ व्या शतकात, १६ व्या शतकात, १७ व्या शतकातही होती, जी आजही आपल्याकडे उपलब्ध आहेत.
शस्त्र प्रदर्शन हे महोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी या देशात आलेल्या सर्व मोगल आक्रमकांचा पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सनातन धर्माचे रक्षण केले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या वेळी ते आणि त्यांचे सैनिक (मावळे) यांच्या हातात जी शस्त्रे होती, ती केवळ शस्त्रे नसून आपला इतिहास आहे. तो आपल्या शौर्याचा पुरावा आहे. अशा शस्त्रांचे भव्य प्रदर्शन महोत्सवात लावण्यात येत आहे. २५० हून अधिक शस्त्रांच्या प्रदर्शनात तलवारी, भाले, घोडेस्वारांची विशेष शस्त्रे, खंजीर, कवच, भेती शस्त्रे, योद्धा महिलांनी वापरलेली विशेष शस्त्रे इत्यादी विविध शस्त्रे असणार आहेत. देहलीत हे शस्त्रप्रदर्शन प्रथमच होत आहे.
(भारत मंडपम्च्या सभागृह -१२ मध्ये १३, १४, १५ डिसेंबर या काळात प्रदर्शन निःशुल्क राहील. याचा सर्वांनी लाभ घ्यावा.)
| ३. भारत मंडपम्मध्ये शंखनाद महोत्सव होणे, हा ईश्वरीय संकेत ! : भारत मंडपम्च्या मुख्य प्रवेशद्वारावर भैरवनाथ महाराजाचे मंदिर आहे. भैरवनाथ महाराजांचे ऐतिहासिक महत्त्व आहे. इंद्रप्रस्थ नगरीतून (आताच्या देहलीतून) पांडव कुरुक्षेत्राकडे निघाले होते, तेव्हा त्यांनी याच भैरवनाथ मंदिरात जाऊन धर्म संस्थापनेसाठी आशीर्वाद घेतले होते. आज त्याच प्रांगणात देशातील ८०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र येतील आणि रामराज्याचा संकल्प करतील. हा केवळ योगायोग नाही, तर ईश्वरीय संकेत आहे ! |
– श्री. अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था (साभार : ‘एन्.एम्.एफ्.’ युट्यूब वाहिनी)
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
जपमाळ
सनातन संस्थेचे साधक त्वचारोगतज्ञ डॉ. मानसिंग शिंदे यांना ‘समाजभान २०२६’ पुरस्कार !
धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !
देवस्थानांचे संरक्षण, शासकीय भूमी मुक्तीसाठी प्रयत्न, धर्मांतरविरोधी लढा आणि व्यापक जनजागृती !
उपसभापती सचिन अहिर यांचे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांच्याकडून अभिनंदन !