उपसभापती सचिन अहिर यांचे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांच्याकडून अभिनंदन !

डावीकडून उपसभापती सचिन अहिर यांना सनातनचे ग्रंथ भेट देतांना अभय वर्तक

मुंबई, ८ जुलै (वार्ता.) – सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी ८ जुलै या दिवशी विधानभवन येथे विधान परिषदेचे नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांची भेट घेऊन अभिनंदन केले. या वेळी अभय वर्तक यांनी उपसभापती सचिन अहिर यांना सनातनचे ग्रंथ भेट दिले, तसेच सनातनच्या आश्रमात येण्याचे निमंत्रण दिले. त्यावर उपसभापती सचिन अहिर यांनी ‘आश्रमाला निश्चित भेट देईन’, असे म्हटले.