धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !

आध्यात्मिक चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेली मुले-मुली

धारुहेरा (हरियाणा) – सनातन संस्थेच्या वतीने धारुहेरा येथील बेस्टेक सिटी मंदिरात २६ जून ते ३० जून या कालावधीत ५ िदवसांचे विनामल्य ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ आयोजित करण्यात आले. यामध्ये स्थानिक अनेक मुलांनी सहभाग घेतला आणि भारतीय संस्कृती, नैतिक मूल्ये अन् सनातन परंपरा यांच्याशी संबंधित विविध विषयांवर प्रशिक्षण घेतले. या शिबिरात विविध प्रेरणादायी उपक्रम, व्यायाम आणि संवादात्मक सत्र यांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या शिबिरात आध्यात्मिक चित्रकला स्पर्धा घेण्यात आली, ज्यामध्ये मुलांनी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विषयांवर सुंदर चित्रे काढली. स्पर्धेत उत्कृष्ट चित्र काढणार्‍या मुलांना भेटवस्तू देण्यात आली.

या शिबिराच्या वेळी उपस्थित अनेक पालकांनी संस्कृती संवर्धन शिबिराचे कौतुक केले. त्यांनी सांगितले, ‘असे कार्यक्रम मुलांचे चारित्र्य घडवण्यासाठी, शिस्त, नैतिक मूल्ये आणि भारतीय संस्कृतीविषयी आदर विकसित करण्यासाठी पुष्कळ उपयुक्त ठरतात.’

क्षणचित्र

१. शिबिरात मुलांचे वाढदिवस शास्त्रानुसार साजरे करण्यात आले. हा अनुभव त्यांच्यासाठी पूर्णपणे नवीन होता. शिबिरात सहभागी झालेली मुले म्हणाले, ‘‘आम्ही यापूर्वी आमचा वाढदिवस अशा प्रकारे कधीच साजरा केला नाही. यापुढेही आम्ही आमचा वाढदिवस यानुसार साजरा करत राहू.’’

२. समारोप सत्राच्या वेळी अनेक पालकांनी सांगितले, ‘मुलांना अशी नैतिक मूल्ये नियमितपणे शिकवायला हवीत. आमच्या मुलांना संस्कार वर्गात नियमितपणे सहभागी करून घ्यायचे आहे.’

३. काही पालकांनी सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात येणार्‍या सत्संगांमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.