सनातन संस्थेचे साधक त्वचारोगतज्ञ डॉ. मानसिंग शिंदे यांना ‘समाजभान २०२६’ पुरस्कार !

त्वचारोगतज्ञ डॉ. मानसिंग शिंदे यांचा सत्कार करतांना मान्यवर

राशिवडे (जिल्हा कोल्हापूर) – कै. केरबा आणोबा बरगे (आबा) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मान्यवरांना पुरस्कार देऊन गुणवतांचा सत्कार करण्यात आला. सनातन संस्थेचे साधक त्वचारोगतज्ञ डॉ. मानसिंग शिंदे यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील सेवा, तसेच अध्यात्मप्रसार आणि धर्मरक्षणासाठी करत असलेल्या कार्यासाठी ‘समाजभान २०२६’ हा विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी डॉ. सूर्याजी पाटील, विजय पाटील, अभिजित पाटील, कुलदीप खोत यांना मान्यवरांनी मानपत्र देऊन गौरवले.

त्वचारोगतज्ञ डॉ. मानसिंग शिंदे यांना मिळालेले मानपत्र

स्व. केरबा बरगे यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी ! – ए.वाय. पाटील

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री. ए.वाय. पाटील म्हणाले, ‘‘काबाडकष्ट करून दुग्ध व्यवसायापासून ट्रक व्यवसाय असा स्व. केरबा बरगे यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे.’’

प्रतिमापूजन त्रिवेणी उद्योग समुहाचे संस्थापक महादेव फराकटे यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. वैशाली गुंजेकर आणि दिगंबर टिपुगडे यांनी केले. गोकुळचे माजी अध्यक्ष जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, शिल्पाताई खोत, भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक आणि गुडाळेश्वर उद्योग समुहाचे संस्थापक ए.डी. पाटील, बालाजी फराकटे, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मोहन पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते.

सनातन संस्थेमुळे वैद्यकीय व्यवसायाकडे ‘साधना’ म्हणून पहायला शिकलो ! – डॉ. मानसिंग शिंदे, त्वचारोगतज्ञ 

मनोगत व्यक्त करतांना त्वचारोगतज्ञ डॉ. मानसिंग शिंदे

हा पुरस्कार मी आई-वडील यांच्या आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधना कशी करायची ते शिकवले, हिंदु धर्मातील सण उत्सव धर्मशास्त्रदृष्ट्या साजरे कसे करायचे ते शिकवले. त्यांच्या कृपेमुळे मी रुग्ण पडताळतांना त्यातून साधना कशी होईल, हे शिकलो.