
भाजपच्या हातात देशाची केंद्रीय सत्ता आल्यापासून आतापर्यंत काही प्रमाणात का होईना, शत्रूबोध होऊन धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणाच्या अनुषंगाने सर्व क्षेत्रांत अनेक सकारात्मक पालट होत आहेत; देशात गौरवशाली सनातन परंपरेची पुनर्जागृती होत आहे; इतिहास, शिक्षण, कायदा, न्याय, अर्थ, सुरक्षा आदी सर्व क्षेत्रांत आमूलाग्र पालट करण्याचा प्रयत्न चालू आहे. असे असतांना ‘सनातन राष्ट्र का हवे आहे ?’, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. काँग्रेसच्या काळ्या राज्यातून राष्ट्र एका सर्वाेच्च स्थानावर जाण्याच्या ध्रुवीकरणाच्या प्रक्रियेतील हा परिवर्तनाचा काळ चालू आहे आणि म्हणूनच ही घुसळण अत्यंत संवेदनशील आहे. राष्ट्रांत सर्व स्तरांवर हे परिवर्तन होत असतांनाच त्याला अधिक योग्य दिशा देणे आवश्यक आहे.

‘हे हिंदु राष्ट्र आहेच; मग वेगळे सांगण्याची आवश्यकता आहे का ?’, असा प्रश्न विचारला जात आहे. हे हिंदु राष्ट्र असते, तर लव्ह जिहादी आणि गोहत्यारे यांचा चौरंगा झाला असता, सरकारीकरण झालेल्या मंदिरांत पैशांचा प्रचंड भ्रष्टाचार झाला नसता, हिंदुद्वेष शिकवणार्या मदरशांना अनुदाने मिळाली नसती, एक इंचही भूमी लाटण्याचे धैर्य धर्मांधांना झाले नसते आणि हिंदूंना न कळणारी हलालची सक्तीही हिंदूंवर झाली नसती. असो. त्यामुळे केवळ राजकीय पटलावरील नव्हे, तर सनातन संस्कृतीचा आध्यात्मिक पाया असलेली आदर्श व्यवस्था निर्माण करणारी; हिंदूंना सर्व स्तरांवर केवळ सुरक्षाच नव्हे, तर पुढे जीवनात आनंदाची प्राप्ती करून देऊ शकते, अशी राष्ट्रनिर्मिती आता अपेक्षित आहे.

त्यासाठी देशाच्या राजधानीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजित केला जात आहे. त्याच्या ध्वनीने अधर्मरूपी शत्रूचे मळभ दूर होऊन सनातन संस्कृती आणि हिंदूंची सुरक्षा यांच्यासाठी चालू असलेल्या शासकीय अन् हिंदुत्वनिष्ठ या दोघांच्या प्रयत्नांना योग्य ती दिशा अन् मोठी गती मिळेल ! ‘भारत शासनाने सनातन धर्महिताचे कार्य करावे’, या मागणीसाठी हा महोत्सव आहे.

सनातन राष्ट्राचे पुनर्जागरण !
‘सनातन राष्ट्र संकल्पने’चे वैचारिक अधिष्ठान अतिशय सुस्पष्ट आणि दृढ करण्यासाठी हा महोत्सव आहे. कुठल्याही समाजात परिवर्तन होतांना ते बौद्धिक, मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरावर होणे आवश्यक असते. हिंदूंना स्वसंस्कृतीची विस्मृती झाल्याने आणि त्यांनी पाश्चात्त्य विकृती धारण केल्याने त्यांच्या बौद्धिक अन् मानसिक परिवर्तनासाठी हा शंखनाद महोत्सव आहे.

यासह शारीरिक स्तरावर करावयाच्या कृतींची मानसिक सिद्धता करण्यासाठी हा शंखनाद महोत्सव आहे. एवढेच नव्हे, तर सनातन राष्ट्राची पुनर्निमिती आध्यात्मिक अधिष्ठानाविना अशक्य असल्याने ‘प्रत्येकाने स्वतःचे आध्यात्मिक बळ वाढवले पाहिजे’, हे सांगण्यासाठी हा महोत्सव आहे. क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज, म्हणजेच शक्ती अन् भक्ती; म्हणजेच श्रद्धा आणि शौर्य यांचा संगम हाच सनातन हिंदु राष्ट्राचा पाया आहे. या दोन्ही गोष्टींचा परिपोष या समस्त भारतवर्षात निर्माण करण्यासाठी हा महोत्सव आहे. म्हणून या महोत्सवाचे स्थान हिंदुस्थानची राजधानी देहली, म्हणजेच पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ हे आहे. गोवा येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाने पेरलेल्या बीजाचा वटवृक्ष होण्यासाठी हा महोत्सव खर्या अर्थाने साहाय्यभूत ठरेल, हे आगामी काळात लक्षात येईल !

शत्रूबोध देण्यासाठी…
‘जगण्यासाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी शत्रूचा निःपात आवश्यक असतो. अधर्मरूपी शत्रू बोकाळतो, तेव्हा त्याला प्रत्यक्ष भगवंताचा अवतारच नष्ट करू शकतो. तसे करून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवंत युगानुयुगे येतो. भगवंताला आळवूनच राजा आणि प्रजा शत्रूवर विजय मिळवू शकते. ती वेळ आता परत आली आहे’, हा संदेश देण्यासाठी हा महोत्सव आहे; पण शत्रू कळला, तर त्याचा निःपात करता येणार. जनतेला शत्रूबोध करून देण्यासाठी महोत्सव महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कलियुगातील शत्रूबोध करून घेण्यातील आणि त्यांचा निःपात करण्यातील भारतातील सर्वाेच्च उदाहरण होते. महोत्सवातील शिवकालीन शस्त्रे पाहून त्यांच्यातील लढाऊ वृत्तीची भावना हिंदूंमध्ये जागृत होणार आहे. सीमेपलीकडील शत्रूसाठी भारताचे पंतप्रधान मोदी सर्वदृष्ट्या सैन्याला सक्षम करत आहेत. देशांतर्गत शत्रूचे आर्थिक स्रोत ते रोखत आहेत, तरीही आक्रमणे थांबलेली नाहीत. ‘स्लीपर सेल’रूपी राष्ट्रांतर्गत शत्रूला तोंड देण्यासाठी हिंदूंना संघटित आिण सक्षम व्हायचे आहे. सर्व प्रकारचे जिहाद आणि धर्मांतर यांना हिंदूंचे संघटन अन् हिंदूंची लढाऊ वृत्ती बंद करू शकते’, हे महोत्सवातून ठसवले जाणार आहे. हिंदूंच्या स्वतःच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी महोत्सवाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महंमद जिनांची कूटनीती आणि काँग्रेस सरकारचे तुष्टीकरण यांमुळे हिंदूंना भोगाव्या लागलेल्या अन् लागत असलेल्या प्रचंड शारीरिक, मानसिक आणि आर्थिक आघातांवर ‘बुलडोझर’, तसेच ‘डिटेंशन सेंटर’सारखे उपाय तर हवेच आहेत; पण त्याही पुढे जाऊन सरकारने हिंदूंच्या रक्षणासाठी नक्षलवादाप्रमाणेच आतंकवादाचा समूळ बीमोड करायला हवा. भांडवलशाही व्यवस्थेतून निर्माण झालेले ‘डीप स्टेट’, त्या माध्यमातून ‘जेन झीं’ना हाताशी धरून केले जाणारे सत्तापालट; गेली १०० वर्षे धर्मांध अन् साम्यवादी यांच्या अभद्र युतीने ‘सर्वधर्मसमभाव’, ‘मानवतावाद’, ‘निधर्मीपणा’, ‘पाश्चात्त्य आधुनिकता’, ‘पुरोगामीत्व’, ‘खोटी कथानके’, ‘टूलकीट’ यांच्या माध्यमातून केलेला हिंदूंचा वैचारिक बुद्धीभेद हे सारे हिंदूंचे आजचे शत्रू आहेत. त्यांचा वैचारिक निःपात कसा करायचा ? हे महोत्सवातून शिकता येणार आहे. राष्ट्र म्हणजे राष्ट्राची जनता. ती राष्ट्राचे रक्षण करते आणि राष्ट्र तिचे रक्षण करते. दोघांचे रक्षण (सनातन) धर्म करतो. आज धर्माचे आचरणही न्यूनतम झाले आहे आणि ते आचरण करणारे हिंदूही न्यून होत आहेत. धर्माचरणाची जाणीव महोत्सवाच्या माध्यमातून हिंदूंच्या मनात रुजणार आहे.

…असे येईल सनातन राष्ट्र !
‘सनातन राष्ट्राचा शंखनाद तर होत आहे; पण ते येणार कसे ?’,हा प्रश्न कुणालाही पडेल. ‘मागितले म्हणजे मिळते’, हा एक साधा नियम आहे. कोट्यवधी हिंदूंना सनातन राष्ट्राचे महत्त्व समजले, तर ते त्याची मागणी करतील. त्यांना सनातन राष्ट्राचे महत्त्व लक्षात येण्यासाठी महोत्सव माध्यम होणार आहे. ‘लोकशाही आणि राज्यघटना यांच्या माध्यमातूनच हे सनातन राष्ट्र येऊ शकते’, हे प्रतिबिंबित करण्यासाठी महोत्सवाचा सहभाग लक्षणीय असणार आहे. स्वदेशीचा जागर करून राष्ट्राचा आर्थिक विकास करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नरत आहे; परंतु राष्ट्राचा आध्यात्मिक विकास झाल्यावरच ते खर्या अर्थाने महासत्ता होणार आहे, हे महोत्सवातून जनसामान्यांवर ठसवले जाणार आहे. देशाला सनातन धर्माचे संपूर्ण अधिष्ठान दिले आणि राज्यघटनेत पालट केला, तर ‘सनातन राष्ट्र’ लवकरच येईल !
| ‘लोकशाही आणि राज्यघटना यांच्या माध्यमातूनच ‘हिंदु राष्ट्र’ येऊ शकते’, हे प्रतिबिंबित करण्यासाठी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन ! |
संपादकीय : हरवलेले समाधान !
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
संपादकीय : दैवी स्वरसाज हरपला !
संपादकीय : ‘गांधीवादा’ची कात टाकलेला भारत !