|

इंद्रप्रस्थ (नवी देहली), १२ डिसेंबर (वार्ता.) – भारतीय संस्कृतीचे रक्षण करणार्या, शास्त्र आणि शस्त्र परंपरा जागृत करणार्या अन् हिंदूंचे शौर्य जागृत करणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’साठी देशाची राजधानी देहली सज्ज झाली आहे. १३ डिसेंबर या दिवशी सकाळी १० वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
भेट द्या → |
महोत्सवात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील मान्यवर, तसेच संत-महंत यांचे देहलीत आगमन झाले आहे. देश-विदेशातील ८०० हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी या महोत्सवात सहभागी होणार आहेत. भारतातील १९ राज्यांतील मान्यवर या महोत्सवासाठी येत आहेत. देहलीतील भारत मंडपम्चे सभागृह महोत्सवासाठी सिद्ध झाले आहे. स्वराज्याची शौर्यगाथा सांगणारे दीड सहस्रांहून अधिक प्राचीन शस्त्रांचे प्रदर्शन ‘भारत मंडपम्’च्या १२ क्रमांकाच्या सभागृहात मांडण्यात आले आहे. मुख्य सभागृहाच्या व्यतिरिक्त अन्य सभागृहात समांतर सत्रांमध्ये मान्यवरांची चर्चासत्रे होतील. उद्घाटन सोहळ्यात ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गीताचे सामूहिक गायन करण्यात येणार आहे. स्वराज्याची विधी आणि न्याय दृष्टी, हिंदु धर्मात पुनर्प्रवेशाविषयी छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टीकोन, हलाल अर्थव्यवस्था आणि धर्मांध, राष्ट्रीय सुरक्षा आणि कायदा यांसारख्या विषयांवर विचारमंथन होणार आहे. भारत मंडपम्च्या भव्य परिसरात महोत्सवाची सिद्धता चालू असून याविषयी परिसरातील लोकांमध्ये उत्सुकता आहे.

हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न