कोल्हापूर येथे ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद : रणरागिणी बनण्याचा युवतींचा निर्धार !

डावीकडून सद्गुरु स्वाती खाडये, सौ. माहेश्वरी सरनोबत, दीपप्रज्वलन करतांना सौ. स्नेहांकिता वरुटे, तेजस्वीनी सावंत, श्री. लखन जाधव, श्री. नितीन वाडीकर, श्री. सुनील घनवट

कोल्हापूर, ७ डिसेंबर (वार्ता.) : हिंदु जनजागृती समिती, ‘सव्यसाची गुरुकुलम्’ आणि ‘भागीरथी महिला संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने ७ डिसेंबर या दिवशी ‘पद्माराजे गर्ल्स हायस्कूल’ येथे आयोजित नि:शुल्क ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरा’स युवती-महिला यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिरात युवतींनी रणरागिणी बनण्याचा निर्धार केला. या शिबिरात नेमबाजीत आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक विजेत्या तेजस्विनी सावंत, दोन वेळेस छत्रपती पुरस्कार विजेत्या ‘आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर’ स्नेहांकीता वरुटे, ‘आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन’ सौ. माहेश्वरी सरनोबत, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.