महोत्सवासाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केली प्रार्थना

पळणी (तमिळनाडू) – सप्तर्षी जीवनाडीपट्टीमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तमिळनाडूच्या दिंडुगल जिल्ह्यातील पळणी येथील श्री कार्तिकेय देवाचे दर्शन घेत त्यांच्या चरणी देहली येथे होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची निमंत्रण पत्रिका अर्पण केली, तसेच ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त येणार्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना केली.
Invitation for the ‘Sanatan Rashtra Shankhnaad Mahotsav’ placed at the divine feet of Shri Karthikeya in Palani, Tamil Nadu.
ShriChitshakti (Mrs.) Anjali Gadgil prayed for the success and divine blessings of this historic event.🙏🔥#Shankhnad_Mahotsav_Delhi
सनातन राष्ट्र pic.twitter.com/WR4nOrSEIW— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 7, 2025
पळणी येथील एका डोंगरावर असलेल्या मंदिरात श्री कार्तिकेय देवाचे जागृत स्थान आहे. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री कार्तिकेय देवाचे राजालंकारात दर्शन घेऊन त्याच्या चरणी फळे आणि फुले अर्पण केली. त्यासह ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची पूर्वसिद्धता आणि प्रत्यक्ष महोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी, तसेच लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली.
पळणी येथील कार्तिकस्वामींचे जागृत मंदिर आणि तेथील ‘नवपाषाण मूर्ती’तमिळनाडूतील पळणी या ठिकाणी कार्तिकस्वामींचे जागृत मंदिर आहे. येथे कार्तिकस्वामींना ‘दंडायुधपाणी’ या नावाने ओळखले जाते. देवतांचे सेनाधिपती असलेले युवा रूपातील कार्तिकस्वामी या ठिकाणी हातात दंड धरून उभे आहेत. या मूर्तीला ‘नवपाषाण मूर्ती’ असे म्हणतात. ‘नव’ म्हणजे ‘९’ आणि ‘पाषाण’ म्हणजे ‘विष’ ! ९ प्रकारच्या विषारी आयुर्वेदीय मूलिका वापरून ‘भोगर्’ नावाच्या ऋषींनी ही मूर्ती बनवली आहे. त्यामुळे तिला ‘नवपाषाण मूर्ती’ असे म्हटले जाते. या ९ प्रकारच्या विषारी आयुर्वेदीय मूलिका शरिराला होणार्या सर्व प्रकाराच्या विषबाधा दूर करणार्या मूलिका आहेत. |
कार्तिकस्वामी यांची राजालंकार पूजा

पळणी येथील कार्तिकेयाला प्रतिदिन सायंकाळी ६ वाजता ‘राजालंकार’ घालण्यात येतात. यात कार्तिकेयाला एक अंगरखा, कमरेला लाल रंगाच्या वस्त्राचा पट्टा आणि धोतर, तसेच डोक्यावर तुरा असणारा राजमुकूट असा पोषाख असतो.
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार