तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे हिंदूंच्या देवतांविषयी संतापजनक विधाने

भाग्यनगर (तेलंगाणा) – हिंदू किती देवतांवर विश्वास ठेवतात ? ३ कोटी देवता आहेत का ? आणि इतक्या देवता का आहेत ? अविवाहितांसाठी एक देवता म्हणजे हनुमान. दोनदा विवाह करणार्यांसाठी वेगळी देवता, दारू पिणार्यांसाठी वेगळी देवता. येल्लम्मा, पोचम्मा, मैसम्मा – दारू अर्पणासाठी एक, कोंबडी बळी देण्यासाठी एक, आणि डाळ-भात अर्पणासाठी एक. प्रत्येक समूहाची स्वतःची देवता आहे, असे विधान तेलंगाणाचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केले.
⚠️ New Low by Telangana CM Revanth Reddy!
🗞️ CM Revanth Reddy claims: “Hindus have a deity for marrying twice and another for drinking alcohol.”
🤦♂️ No one insults Hindu Dharma more than these so-called “progressive” Congress & Socialist leaders. Their habitual mockery of our… pic.twitter.com/vOj9z1LRsJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 4, 2025
ते येथील गांधी भवनामध्ये झालेल्या बैठकीत बोलत होते. त्यांच्यावर भाजप, विश्व हिंदु परिषद यांनी टीका केली आहे. तसेच भाग्यनगरच्या गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनीही कठोर टीका केली आहे.
तेलंगाना के मुख्यमंत्री रेवंत रेड्डी ने हिंदू देवी देवताओं को लेकर विवादित टिप्पणी की। उन्होंने कहा, “हिंदू कितने देवताओं में विश्वास करते हैं? क्या वे तीन करोड़ हैं? इतने देवता क्यों हैं? अविवाहित लोगों के लिए एक देवता, हनुमान।
जो दो बार शादी करते हैं, उनके लिए एक और देवता। और… pic.twitter.com/6piWlsIkec
— Raja Singh (@TigerRajaSingh) December 2, 2025
रेवंत रेड्डी यांनी इस्लाम स्वीकारला आहे का ? – आमदार टी. राजा सिंह

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी नारायणपेट जिल्ह्यातील मख्तल येथे झालेल्या सभेत बोलतांना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर प्रखर टीका केली. ते म्हणाले की, भाजपच्या विद्यार्थी संघटनेतून आलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारची विधाने होणे धक्कादायक आहे. रेवंत रेड्डी यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्यासोबत झालेल्या बंद दाराआड झालेल्या बैठकीनंतर धर्मांतराची योजना आखली आहे का ? त्या भेटीनंतर ते हिंदूंच्या देवतांना लक्ष्य करण्याचा आणि अपकीर्त करण्याचा विचार करत आहेत का ? रेवंत रेड्डी यांनी इस्लाम स्वीकारला आहे का ? असे प्रश्न विचारले.
राजा सिंह पुढे म्हणाले की, तेलंगणातील हिंदूंनी आता तरी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे खरे स्वरूप ओळखावे. हिंदूंच्या देवतांचा अपमान करणार्या व्यक्तीला सत्तेवर आणल्याची जाणीव लोकांनी ठेवली पाहिजे.
भाजप आणि विहिंप यांची टीका
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार यांनी सांगितले की भाजपने आधीच चेतावणी दिली होती की, काँग्रेस किंवा भारत राष्ट्र समिती सत्तेत आल्यास हिंदूंचा स्वाभिमान धोक्यात येईल. ही चेतावणी रेवंत रेड्डी यांच्या विधानामुळे खरी ठरली. विश्व हिंदु परिषदने या विधानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी विनाअट क्षमा मागावी, अशी मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकाअन्य धर्मीय हिंदु धर्माची जितकी विटंबना करत नाहीत, त्यापेक्षा अधिक विटंबना हिंदु धर्मीय आणि त्यातही पुरो(अधो)गामी, काँग्रेसी, समाजवादी पक्ष आदी राजकीय पक्षाचे नेते करतात ! हे पहाता आता ज्या प्रमाणे पाकिस्तानमध्ये धर्माचा अवमान करणार्यांना फाशीची शिक्षा आहे, तसाच कायदा भारतातही करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. तरच अशांवर वचक बसेल ! |
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी