Surat Illegal Church : सूरत (गुजरात) येथे आदिवासींच्या भूमीवर बांधले जात आहे अनधिकृत चर्च !  

धर्मांतराद्वारे संस्कृती नष्ट केली जात असल्याची गावकर्‍यांची भावना

स्थानिक हिदूंचा चर्चच्या बांधकामाला विरोध

सूरत (गुजरात) – उमरपाडा येथील बहार गावातील आदिवासींच्या भूमीवर एका अनधिकृत चर्चचे बांधकाम चालू असल्याचे उघड झाले आहे. बहार गावातील स्थानिक हिंदूंनी या चर्चच्या बांधकामाला तीव्र विरोध केला आहे. बांधकामासाठी कोणतीही अनुमती घेण्यात आली नसल्याचे गावकर्‍यांनी सांगितले.

१. आदिवासी समुदायाच्या लोकांचा मते या चर्चमुळे परिसरात धर्मांतराच्या कारवायांनाही चालना मिळत आहे. लोकांना धर्मांतर करण्यासाठी आमीष दाखवले जात असून हे स्थानिकांची पारंपरिक संस्कृती आणि प्रथा नष्ट करण्याच्या कटाचा एक भाग आहे.

२. आदिवासी समुदायाच्या एका सदस्याने सांगितले, ‘आदिवासी समुदाय प्राचीन काळापासून नागदेव, गोवळदेव, वाघदेव आणि इतर देवतांची पूजा करत आहे. ही प्रथा आणि परंपरा अनादी काळापासून चालू आहे; परंतु आजकाल आदिवासी भागात मोठे चर्च बांधले जात आहेत आणि विनापरवाना मेळावे आयोजित केले जात आहेत. निष्पाप आदिवासी लोकांना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. हे षड्यंत्र आदिवासी संस्कृतीचा नाश करण्याच्या उद्देशाने आहे.’

उत्तरदायी पाद्रीविरुद्ध कारवाई करा ! – ग्रामस्थ

ग्रामस्थांनी या अनधिकृत बांधकामात सहभागी असलेल्या ख्रिस्ती संघटनेच्या पाद्रीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे आणि उमरपाडाच्या स्थानिक प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारे अनधिकृत चर्च बांधून हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या कट्टरतवादी ख्रिस्त्यांना जन्माची अद्दल घडवणे आवश्यक !