‘त्रेतायुगात मार्गशीर्ष शुक्ल पंचमीच्या शुभतिथीला प्रभु श्रीराम आणि सीता यांचा मंगल विवाह झाला होता. या शुभ तिथीला, म्हणजे २५.११.२०२५ या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या मंदिराच्या शिखरावर भगव्या रंगाचा धर्मध्वज फडकवण्यात आला. या ध्वजाची लांबी २२ फूट आणि रूंदी ११ फूट आहे. ध्वजारोहण अभिजित मुहूर्तावर सकाळी ११.५० वाजता करण्यात आले. या ध्वजारोहणाच्या शुभ कार्यक्रमाचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे लेखबद्ध केले आहे.

१. ध्वजाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये
१ अ. धर्मध्वजाच्या भगव्या रंगाचे वैशिष्ट्य आणि त्याच्या चमकदारपणातून कर्महिंदूंना मिळणारा संदेश : ध्वजाचा रंग भगवा आहे. भगवा रंग हा ‘शौर्य’ आणि ‘त्याग’ यांचे प्रतीक आहे. अयोध्येमध्ये प्रभु श्रीरामाच्या मंदिराची पुनर्स्थापना होण्यासाठी असंख्य रामभक्तांनी सुमारे ५०० वर्षांपेक्षा दीर्घकाळ सतत संघर्ष केला होता. त्यांचे त्याग आणि बलीदान यांच्यामुळे आज अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या भव्य मंदिराचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे निकट भविष्यात संपूर्ण पृथ्वीवर येणार्या हिंदु राष्ट्राचा पाया हा असाच धर्माधिष्ठित कर्महिंदूंच्या त्याग आणि शौर्य या दैवी गुणांवर आधारित असेल. धर्मध्वजाचा भगवा रंग चमकत आहे; कारण त्यामध्ये धर्मतेज, म्हणजे चैतन्य सामावले आहे. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेकरता प्रयत्नरत असणार्या हिंदूंनी केवळ धर्माचरण करून प्रयत्न न थांबवता धर्माचरणाला काळानुसार साधनेची जोड द्यावी’, हा संदेश धर्मध्वज कर्महिंदूना देत आहे’, असे जाणवले.


२. ध्वजावर विविध चिन्हे अंकित असल्याचे प्रतीक
२ अ. धर्मध्वजावरील ‘कोविदार वृक्षा’च्या चित्राचे आध्यात्मिक महत्त्व : ‘कोविदार वृक्ष’ हा पारिजात आणि मंदार या वृक्षांच्या संयोगाने बनलेला वृक्ष आहे. कोविदार वृक्ष हा प्रभु श्रीरामाच्या रघुकुळाचे प्रतीक आहे. त्यामुळे कोविदार वृक्षाचे चिन्ह असलेला भगवा ध्वज हा रघुकुळातील राजांचा राष्ट्रध्वज होता. हा वृक्ष आयुर्वेदाचे गुणांनी युक्त असून तो अत्यंत उपयुक्त आहे. ज्याप्रमाणे वृक्षाची मुळे भूमीत खोलवर रुजलेली असतात, तसेच कोणत्याही राष्ट्राची निर्मिती तिच्यातील धर्मरूपी मुळांवर आधारित असते. येणार्या हिंदु राष्ट्राची मुळेही कोविदार वृक्षाप्रमाणे हिंदु धर्मशास्त्राच्या सखोल आणि परिपूर्ण ज्ञानतेजावर आधारित असणार आहेत. त्यामुळे हिंदु राष्ट्र हे कोविदार वृक्षाप्रमाणे संपूर्ण विश्वाच्या केवळ भौतिक विकासाशी निगडित नसून ते पारमार्थिक उद्धार आणि आध्यात्मिक उत्कर्ष करणारे प्रभु श्रीरामाप्रमाणे परम आदर्श अन् परम कल्याणकारी राज्य असेल’, हा बोध धर्मध्वजावरील कोविदार वृक्ष संपूर्ण विश्वाला देत आहे.
२ आ. धर्मध्वजावरील ‘सूर्यदेवाच्या चित्रा’चे आध्यात्मिक महत्त्व : धर्मध्वजावरील ‘सूर्याचे चिन्ह’ हे प्रभु श्रीरामाच्या सूर्यवंशी ईक्ष्वाकु वंशाचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे प्रभु श्रीरामाचा ईक्ष्वाकु वंश हा परम प्रतापी, दानी आणि आदर्श होता, तसेच पृथ्वीवर स्थापन होणारे हिंदु राष्ट्रही सूर्याप्रमाणे निष्कलंक, तेजस्वी अन् सर्वदृष्ट्या आदर्श असणार आहे. ‘भगवान सूर्यनारायण हे कर्महिंदूंना दैवी तेज आणि शक्ती पुरवून संपूर्ण पृथ्वीवर हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आशीर्वाद देत आहेत’, हा बोध ध्वजावरील सूर्याचे चित्र करून देत आहे. ‘भगवान सूर्यनारायणाप्रमाणे हिंदु धर्माची कीर्ती दिगंत आणि केवळ कलियुगातील काही सहस्रो वर्षांपुरतीच नव्हे, तर युगानुयुगे टिकून रहाणार आहे’, अशी घोषणा सूर्यनारायणाने केलेली आहे’, असे जाणवले
२ इ. धर्मध्वजावरील ‘ॐ’ या चिन्हाचे आध्यात्मिक महत्त्व : धर्मध्वजावरील ‘ॐ’ हे चिन्ह हिंदु धर्माचे प्रतीक आहे. हिंदु राष्ट्र हे केवळ भौगोलिक स्तरावरील राष्ट्र नसून ते वेदांच्या ज्ञानावर आधारित असणारे आणि कलियुगरूपी काळाच्या पलीकडे असणारे धर्माधिष्ठित धर्मराज्य असेल. त्याचप्रमाणे धर्मध्वजावरील ‘ॐ’ हे चिन्ह ‘सर्व पंथांना स्वतःमध्ये सामावून घेणार्या हिंदु धर्माचे प्रतीक असून ते सर्वपंथीय उपासकांना ईश्वराच्या सगुण उपासनेसह निर्गुण उपासनेकडे जाण्याचा मौलिक संदेश देत असल्याचे जाणवले.
३. धर्मध्वजावरील विविध चित्रांचा धर्मध्वज पहाणार्या व्यक्तींवर होणारा परिणाम !

टीप १ : ‘धर्मवृक्ष’ हा धर्मरूपी पाया किंवा मुळे असलेला असतो. त्याच्या शाखा या धर्मराज्याच्या विस्ताराचे प्रतीक असतात.
टीप २ : ‘सूर्य’ हा ‘धर्मतेज’ असून धर्माला बळ पुरवणारा धर्मस्रोत आहे.
टीप ३ : ‘ॐ’ हे धर्मज्ञानरूपी ‘धर्मबीज’ आहे. या धर्मबिजातूनच संपूर्ण विश्वाची निर्मिती झालेली आहे.
अशा प्रकारे प्रभु श्रीरामाच्या मंदिरावर स्थापन झालेल्या धर्मध्वजामुळे भारतातून प्रारंभ होणार्या हिंदु राष्ट्राची व्याप्ती ही ब्रह्मांड व्यापणार्या ‘ॐ’काराप्रमाणे संपूर्ण विश्वात असणार असून संपूर्ण विश्वात सुख, शांती आणि समृद्धी नांदणार आहे.
धर्मध्वज असे धर्मराज्याचे द्योतक !

धर्मध्वजावर कोविदार वृक्ष असे अंकित ।
तो असे त्याग आणि शौर्य यांचे प्रतीक ।।
सूर्यदेव असे धर्मतेजाचे द्योतक ।
‘ॐ’ चिन्ह असे निर्गुण वाचक ।।
धर्मध्वज असे धर्मराज्याचे द्योतक ।
धर्म आणि नीती यांचे तो प्रतीक ।।
।। जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।।
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
४. शुभ मुहूर्तावर धर्मध्वजाचे रोहण होण्यामागील कार्यकारणभाव
मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील पंचमीच्या तिथीच्या अभिजात मुहूर्तावर अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज स्थापन होणे, म्हणजे कलियुगाच्या अंतर्गत एका धर्मयुगाचा प्रारंभ होण्याचा शुभसंकेत मिळाला आहे.

५. धर्मध्वजाचे रोहण होणे, म्हणजे पृथ्वीवरील धर्मराज्याच्या स्थापनेच्या श्रीरामरूपी संकल्पाला सीतारूपी शक्तीचे दैवी बळ प्राप्त होणे
त्रेतायुगातील मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील पंचमीला प्रभु श्रीराम आणि सीता यांचा विवाह झाला होता. त्यामुळे ही तिथी ‘विवाह पंचमी’ या नावाने विख्यात आहे. या तिथीला धर्मध्वजाचे रोहण होणे, म्हणजे पृथ्वीवरील धर्मराज्याच्या स्थापनेच्या श्रीरामरूपी संकल्पाला सीतारूपी शक्तीचे दैवी बळ प्राप्त होणे. अशा प्रकारे संकल्पाच्या विचाराला शक्तीचे बळ प्राप्त झाल्यावरच संकल्प सिद्धीस जातो. त्यामुळे या तिथीला केलेले रामराज्यरूपी आणि सुराज्यरूपी धर्मराज्याच्या स्थापनेच्या संकल्पाला ईश्वराकडून दैवी शक्ती प्राप्त झाली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत हा संकल्प सिद्धीस जाऊन संपूर्ण पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना होणार असून त्याचा विस्तार ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे) या मूलमंत्रावर होणार आहे.
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.११.२०२५)
| • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !