|
न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्रांनी जगातील वाढत्या शहरीकरणाविषयी चिंता व्यक्त करणारा ‘जागतिक शहरीकरण प्रॉस्पेक्टस २०२५’ हा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार जगातील प्रत्येक ५ पैकी ४ लोक हे आता शहरांमध्ये वास्तव्य करतात. याचा अर्थ ८० टक्क्यांहून अधिक लोक आता शहरात रहायला आले आहेत. ८ वर्षांपूर्वी ही टक्केवारी केवळ ५५ होती. याचा अर्थ सरळ आहे. एकेकाळी मानवी संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेली गावे आणि ग्रामीण भाग आता ओस पडत आहेत.
लोकांचा शहरांकडील ओढा म्हणजे केवळ रहाण्याच्या जागांमध्ये पालट आहे असे नाही, तर समाज, अर्थव्यवस्था आणि लोकांचे आरोग्य यांवरही त्याचा परिणाम होत आहे.
अहवालातील काही आकडेवारी अशी !
१. जगातील ८० टक्के लोक शहरांमध्ये रहात आहेत.
२. यात ४५ टक्के लोक शहरांमध्ये, तर ३६ टक्के लोक निमशहरी भागांमध्ये रहातात.
३. हा अहवाल पॅट्रिक गेरलँड यांच्या नेतृत्वाखाली अनेक संशोधकांच्या सहकार्याने सिद्ध करण्यात आला आहे.
४. अनुमान आहे की, वर्ष २०५० पर्यंत जगातील ८३ टक्के लोकसंख्या शहरात राहील.
५. पूर्व आणि दक्षिण आशियामध्ये, विशेषतः भारतासारख्या देशांमध्ये लोक गावे सोडून शहरांमध्ये जात आहेत. चांगले शिक्षण, नोकर्या किंवा चांगले सामाजिक जीवन जगण्यासाठी हे पालट दिसून येत आहेत.
वाढत्या शहरीकरणाचा आरोग्यावर गंभीर परिणाम !
शहरीकरणाचा परिणाम केवळ लोकसंख्येवरच नाही, तर लोकांच्या आरोग्यावरही होत आहे. ‘किंग्ज कॉलेज लंडन’मधील तज्ञ अँड्रिया मेशेली यांच्या मते, शहरांमध्ये वायूप्रदूषण आणि वाढती उष्णता लोकांना आजारी बनवत आहे. यामुळे हृदयरोग आणि ‘अल्झायमर’ यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. यासह चिंता आणि नैराश्य यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्येही वाढ होत आहे.

संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
(म्हणे) ‘पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याने त्यावर बंदी आणावी !’
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !