श्रीराममंदिराच्या ध्वजारोहणावरून पाकचा थयथयाट !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – अयोध्येतील श्रीराममंदिराची उभारणी आणि ध्वजारोहण, हा भारतातील अल्पसंख्यांकांना दडपण्याचा भाग असून मुसलमानांच्या धार्मिक स्थळांची जाणूनबुजून हानी करण्याचा प्रयत्न आहे, असा थयथयाट पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. बाबरी ढाचा पाडल्याच्या घटनेचा उल्लेख करत बाबरी ‘ऐतिहासिक प्रार्थनास्थळ’ असल्याचे विधान केले.
Tantrum from Across the Border 🇵🇰➡️🇮🇳
Pakistan fumes over the Dhwajarohan at Shri Ram Mandir, calling it “suppression of minorities”!
India doesn’t need approval from a failed state. Instead of crying over Babri, Pakistan should answer for the crumbling condition of Hindu… https://t.co/4PcKgOlD4l pic.twitter.com/MfYsKfDXZv
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 26, 2025
संयुक्त राष्ट्रांना केले आवाहन
पाकिस्तानने भारतातील कथित इस्लामोफोबिया (इस्लामविषयीचा द्वेष), आक्षेपार्ह विधाने आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचार यांचा उल्लेख करत संयुक्त राष्ट्र अन् इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी पाकने केली आहे. भारतातील मशिदी आणि इस्लामी सांस्कृतिक वारसा सुरक्षित ठेवण्याचे दायित्व स्वीकारण्याचेही आवाहन पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले. (बुजगावणे असणार्या संयुक्त राष्ट्रांनी या संदर्भात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये आणि केला, तर त्याला भारताकडून कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, हे त्याने लक्षात ठेवावे ! उलट संयुक्त राष्ट्रांनी पाकमधील हिंदूंची मंदिरे, अहमदीया पंथाच्या मुसलमानांच्या मशिदी, यांविषयी हस्तक्षेप करावा, अशी भारताची मागणी असेल ! – संपादक)
पाकमध्ये हिंदूंच्या मंदिराची दूरवस्था !
पाकिस्तान बाबरी ढाचावरून अश्रू ढाळत असतांना पाकमध्ये हिंदूंच्या मंदिरांची वर्षानुवर्षे दूरवस्था झाल्याविषयी त्याने मौन बाळलेले आहे. पाकिस्तानातील शारदा पीठ, कराचीतील दीडशे वर्षांचे जगन्नाथ मंदिर, रावळपिंडीतील वर्ष १९३० मध्ये उभारलेले मोहन मंदिर, अशा अनेक हिंदु देवस्थानांवर मुसलमानांनी नियंत्रण मिळवले आहे आणि ही मंदिरे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या सर्वांवर पाक सरकारने कधी आवाज उठवला नाही; पण ‘भारतातील मशिदींना धोका आहे’, असे सांगत आहे.
संपादकीय भूमिकापाकच्या या थयथयाटाला भारत भीक घालत नाही ! पाकने बाबरीवरून छाती पिटण्यापेक्षा पाकमधील हिंदूंच्या मंदिरांच्या दूरवस्थेविषयी बोलायला हवे ! |

कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
Obesity Among Children : युरोपीय देशांप्रमाणे भारतातील मुलांमध्ये वाढत आहे लठ्ठपणाचा धोका !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !