Netanyahu India Visit : इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांचा भारताचा दौरा तिसर्‍यांदा रहित

देहली बाँबस्फोटाचा परिणाम

इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू

नवी देहली – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताचा दौरा तिसर्‍यांदा रहित केला आहे. ते डिसेंबर मासात भारतात येणार होते. देहलीत झालेल्या बाँबस्फोटामुळे सुरक्षेच्या कारणावरून त्यांनी दौरा रहित केल्याचे म्हटले जात आहे; मात्र पुढील वर्षात भेटीसाठी नवीन तारखा शोधल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. नेतान्याहू यांनी याआधी वर्ष २०१८ मध्ये भारताचा दौरा केला होता.

नेतान्याहू यांचा हा दौरा त्यांच्या जागतिक स्तरावरील स्थानाचे प्रदर्शन करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात होता. त्यांच्या पक्षाने जुलैमध्ये पंतप्रधान मोदी, ट्रम्प आणि पुतिन यांच्यासमवतेची त्यांची छायाचित्रे असलेले फलक लावून त्यांना ‘अद्वितीय उंचीचा नेता’ म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला होता.