पंचकुला (हरियाणा) – पंचकुलाच्या महापौर कार्यालयाला आणि महानगरपालिकेला एक ई-मेल पाठवण्यात आला आहे. यामध्ये पंचकुला महापौर कार्यालय, उत्तर भारतातील अनेक प्रसिद्ध मंदिरे आणि देहली-अंबाला-चंडीगड रेल्वे मार्ग बाँबद्वारे उडवण्याची उघड धमकी देण्यात आली आहे. या ई-मेलमध्ये ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’ आणि ‘हरियाणा बनेगा खलिस्तान’ यांसारख्या आक्षेपार्ह घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. यानंतर सुरक्षायंत्रणा सर्तक झाल्या असून त्यांनी अन्वेषण चालू केले आहे.
ई-मेलमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, ५ आणि ६ जून या दिवशी रेल्वे मार्गावर स्फोट केले जातील, त्यामुळे कुणीही प्रवास करू नये.
ई-मेलमध्ये दिलेली मंदिरांची नावे
- कालका जी मंदिर (देहली)
- भीमा देवी मंदिर (पिंजोर)
- कार्तिकेय मंदिर (पिहोवा)
- स्थाणेश्वर महादेव मंदिर (कुरुक्षेत्र)
- गौरी शंकर मंदिर (चांदनी चौक, देहली)
- योगमाया मंदिर (मेहरौली, देहली)

हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !