मृतांमध्ये विदेशी नागरिकांचा सर्वाधिक समावेश
हॉटेलकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने अधिक लोकांचा मृत्यू

नवी देहली – देहलीतील मालवीय नगरामधील ‘लेमन ग्रीन रेस्तराँ’ या हॉटेलला ३ जूनच्या सकाळी लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये विदेशी नागरिक अधिक आहेत. घायाळ झालेल्या ३९ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांतील १५ जणांना अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ज्या इमारतीला आग लागली, ती ६ मजली इमारत असून पूर्वी त्यात ‘फ्लोरिस स्टे’ हॉटेल होते. आतापर्यंत इमारतीमधून अनुमाने ३७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. आग इतकी भीषण होती की, अनेकांनी जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या वरच्या मजल्यावरून खाली उड्या मारल्या. साहाय्यता कार्याच्या वेळी १० पोलीस कर्मचारी घायाळ झाले असून त्यांनाही रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आग नेमकी कशामुळे लागली ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
🔥 21 Killed in Massive Hotel Fire in Delhi
Among the deceased, foreign nationals form the largest group. Reports indicate that violations of safety regulations by the hotel contributed to the tragedy.
Time and again, fires in hotels, hostels, offices, shops, and private… pic.twitter.com/3hcBhyu59e
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 3, 2026
वीज बंद होऊन इलेक्ट्रॉनिक प्रवेशद्वार बंद झाल्याने लोक आत अडकले !
इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार इलेक्ट्रॉनिक होते, जे वीज गेल्यावर बंद झाले आणि लोकांचा बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला. स्थानिक लोकांनी काच फोडून आत अडकलेल्या लोकांना साहाय्य करण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी दुसर्या मजल्यावरून उडी मारली, त्यामुळे ते घायाळ झाले. लोकांनी जवळच्या हॉटेल्समधून गाद्या आणून भूमीवर पसरवल्या, जेणेकरून वरून उडी मारणार्यांचे प्राण वाचू शकतील. एका महिलेने दोरीच्या साहाय्याने खाली उतरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिचा हात घसरल्याने ती गाद्यांवर पडली आणि वाचली. अग्नीशमन दल येईपर्यंत स्थानिक लोक सतत साहाय्य करत होते.
पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले दुःख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताविषयी दुःख व्यक्त केले आणि मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख, तर घायाळांना प्रत्येकी ५० सहस्र रुपयांची हानीभरपाई घोषित केली. (घायाळांना अधिक रक्कम देणे आवश्यक आहे; कारण उपचारार्थ होणारा खर्च, तसेच अपघातात विकलांग झाल्यास जीवन जगण्यासाठी अधिक पैसे लागतात. – संपादक)
६ खोल्यांची अनुमती असतांना २५ खोल्या बांधल्या !तळमजल्यावर रेस्टॉरंट चालवले जात होते, तर इमारतीचा उर्वरित भाग हॉटेल म्हणून वापरला जात होता. हॉटेलमध्ये ये-जा करण्यासाठी केवळ एकच मार्ग होता. हॉटेलमध्ये केवळ ६ खोल्या बांधण्याची अनुमती होती; परंतु येथे अवैधपणे २५ खोल्या बांधण्यात आल्या होत्या. |
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रहित !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
Maharashtra Hostel Scam : बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !