
२३ नोव्हेंबर हा दिवस १२ व्या / १३ व्या शतकातील इटालियन गणितज्ञ फिबोनाची याच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘फिबोनाची डे’ म्हणून साजरा केला जातो. त्याने त्याच्या ‘लिबेर आबाची’ या ग्रंथात मांडलेली १,१,२,३,५,८,१३,२१,३४,५५… ही आकड्यांची रचना ‘फिबोनाची सिक्वेन्स’ म्हणून प्रसिद्ध आहे. ही निसर्गात फुलांमधील पाकळ्यांची, फळांमधील बियांची रचना अशी जागोजागी आढळते, तसेच गणित, अर्थशास्त्रातील मॉडेल्स (प्रतिमान), ‘प्रोग्रामिंग’ (प्रणाली) अशा विविध क्षेत्रांमध्येही तिचा वापर होतो. या सिक्वेन्समधील १,१,२,३ या पहिल्या ४ आकड्यांवरून २३/११ हा ‘फिबोनाची डे’ ठरवला गेला आहे.

वास्तव हे आहे की, किमान इसवी सनपूर्व तिसर्या शतकात भारतात होऊन गेलेले आचार्य पिंगल यांना हा सिक्वेन्स छंदशास्त्राचा अभ्यास करतांना पहिल्यांदा आढळला. महंमद बिन कासिम याने वर्ष ७११ मध्ये सिंध प्रांतावर आक्रमण केले, तेव्हा अरबांची प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेशी ओळख झाली. त्यांनी आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त आणि इतर अनेक शास्त्रज्ञ, गणिती यांचे ग्रंथ बगदादला नेऊन त्यांचे अरेबिक भाषेमध्ये भाषांतर केले. फिबोनाची त्याच्या वडिलांसह अल्जीरियात व्यापारासाठी रहात असतांना त्याने हे ग्रंथ वाचले आणि त्यातील प्रगत ज्ञानाच्या दर्शनाने तो थक्क झाला. ‘लिबेर अबाची’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत तो लिहितो, ‘लॅटिन वंश ज्ञानाच्या प्रगतीत मागे पडू नये; म्हणून मी हा ग्रंथ लिहिला आहे.’
विशेष म्हणजे ‘हे ज्ञान आपल्याला भारतियांकडून मिळाले’, हे त्याने प्रामाणिकपणे मान्य केले. आकड्यांच्या या रचनेचे वर्णन त्याने ‘इंडियन सिरीज’ असे केले. दुर्दैवाने इतर अनेक युरोपियन शास्त्रज्ञांनी हा प्रामाणिकपणा दाखवला नाही. त्यामुळे प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचे श्रेय नेहमीच नाकारले गेले. गुलामी मानसिकतेत अडकलेल्या भारतियांनी ही परिस्थिती पालटण्याचा कधी प्रयत्नही केला नाही.
(अधिक विस्तृत माहिती माझ्या ‘भारत : सत्य, सत्व, स्वत्व’ या पुस्तकात वाचा.)
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (२३.११.२०२५)
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !