तमिळनाडूचे हिंदुद्वेष्टे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी देवभाषा संस्कृतला म्हटले ‘मृत’ !

(द्रमुक, म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम्, म्हणजेच द्रविड प्रगती संघ)

तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि  भाजपच्या नेत्या तमिलिसाई सुंदरराजन्

चेन्नई (तमिळनाडू) – साधारण २ वर्षांपूर्वी सनातन धर्माला डेंग्यू आणि मलेरिया यांसारखा आजार संबोधणारे द्रमुकचे कट्टर हिंदुद्वेषी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी आता देवभाषा संस्कृतवर टीका केली आहे. एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी संस्कृतला ‘मृत भाषा’ म्हटले. ते म्हणाले की, केंद्र सरकारने गेल्या १० वर्षांत संस्कृतसाठी २ सहस्र ४०० कोटी रुपये दिले, तर तमिळ भाषेसाठी केवळ १५० कोटी रुपये दिले. उदयनिधी यांनी पंतप्रधान मोदी यांना प्रश्न केला की, मुले तमिळ शिकण्यास उत्सुक असतांना हिंदी आणि संस्कृत शिकण्यासाठी त्यांच्यावर दबाव का टाकत आहात ? (अशा प्रकारे भाषा आणि प्रांत यांच्या आधारे हिंदूंमध्ये फूट पाडू पहाणार्‍या राजकीय नेत्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे ! – संपादक)

भाजपकडून तीव्र विरोध !

स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर भाजपच्या नेत्या आणि तेलंगाणाच्या माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन् यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

त्या म्हणाल्या की,

इतर भाषांना अल्प लेखणे तमिळ संस्कृतीला मान्य नाही. आपण आपल्या भाषेवर प्रेम केले पाहिजे आणि इतर भाषांचा आदर केला पाहिजे.

संपादकीय भूमिका

अशा हिंदुद्वेष्ट्या ‘उदय’निधी स्टॅलिन यांचा राजकीय ‘अस्त’ करण्यासाठी आता तमिळनाडूच्या हिंदु जनतेने पुढे सरसावले पाहिजे ! पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत उदयनिधी आणि त्यांचा द्रमुक पक्ष यांना धूळ चारणेच आता आवश्यक आहे !