गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या वेळी हत्येचा आदेश दिल्याचा आरोप

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना येथील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने फाशीची शिक्षा सुनावली. त्यांच्यावर गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या कथित उठावाच्या वेळी झालेल्या हिंसाचाराच्या वेळी हत्येला प्रवृत्त करणे आणि हत्येचा आदेश देणे, असे आरोप ठेवण्यात आले होते. याच प्रकरणात देशाचे माजी गृहमंत्री असदुज्जमान खान यांना १२ जणांच्या हत्येचा दोषी ठरवले आणि त्यांनाही फाशीची शिक्षा सुनावली. तसेच तिसरे आरोपी पोलीस महानिरीक्षक अब्दुल्ला अल्-मामुन यांना ५ वर्षांच्या कारागृहवासाची शिक्षा सुनावण्यात आली. मामुन सध्या कोठडीत असून ते साक्षीदार बनले आहेत. न्यायालयाने हसीना आणि असदुज्जमान कमाल यांच्या मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला. ५ ऑगस्ट २०२४ या दिवशी सत्तापालटानंतर शेख हसीना आणि असदुज्जमान यांनी देश सोडला. दोन्ही नेते गेल्या १५ महिन्यांपासून भारतात रहात आहेत. न्यायालयाने शेख हसीना यांची सर्व मालमत्ताही जप्त करण्याचा आदेश दिला.
🇧🇩 #Bangladesh Shockwave
Bangladesh’s International Crimes Tribunal has sentenced former PM #SheikhHasina to death, after finding her guilty of crimes against humanity during the 2024 students’ protests.
Hasina has rejected the verdict, calling the ICT a rigged, unelected… pic.twitter.com/bCIYGL23V8
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 17, 2025
विशेष म्हणजे हसीना यांनीच पंतप्रधान असतांना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाची स्थापना केली होती. वर्ष १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धाच्या वेळी झालेल्या युद्ध गुन्ह्यांची आणि नरसंहाराची चौकशी करण्यासाठी, तसेच गुन्हेगारांवर खटला चालवण्यासाठी वर्ष २०१० मध्ये याची स्थापना करण्यात आली होती.
निकाल चुकीचा आणि पक्षपाती ! – शेख हसीना

न्यायालयाच्या निकालावर शेख हसीना म्हणाल्या की, हा निकाल अन्याय्य, पक्षपाती आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. हा निर्णय एका अनिर्वाचित सरकारद्वारे चालवल्या जाणार्या न्यायाधिकरणाने दिला आहे. तो सार्वजनिक जनादेश नाही. यात माझी बाजू ऐकलीच गेली नाही. लोकांना ठाऊक आहे की, हे संपूर्ण प्रकरण प्रत्यक्ष घटनांचे अन्वेषण नाही, तर अवामी लीग पक्षाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न आहे. युनूस सरकारच्या काळात पोलीस व्यवस्थ आणिा न्यायव्यवस्था दुर्बल झाली आहे. अवामी लीगचे समर्थक आणि हिंदु अल्पसंख्यांक यांच्यावरील आक्रमणे वाढली आहेत, महिलांचे अधिकार दडपले जात आहेत अन् कट्टरतावाद्यांचा प्रभाव वाढत आहे. डॉ. युनूस यांना कुणीही निवडून दिले नाही. बांगलादेशाची पुढील निवडणूक पूर्णपणे मुक्त आणि निष्पक्ष असावी.

माझी आई भारतात सुरक्षित ! – शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद

शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांना सांगितले होते की, त्यांना आधीच ठाऊक होते की, त्यांच्या आईला फाशीची शिक्षा सुनावण्यात येईल. शेख हसीना भारतात सुरक्षित आहेत आणि भारतीय सुरक्षा संस्था त्यांचे पूर्ण संरक्षण करतील, असेही ते म्हणाले.
दिसताचक्षणी गोळीबार करण्याचे आदेश
निकाल येण्याच्या २ दिवसांपूर्वीपासूनच बांगलादेशात प्रचंड हिंसाचार चालू झाला होता. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सरकारच्या विरोधात हिंसक आंदोलन करण्यात येत होते. यानंतर पोलिसांना दिसताचक्षणी गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला. त्यामुळे निकाल लागल्याच्या दिवशी सर्वत्र शांतता होती.
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या