
पनवेल – पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणार्या लोकलमध्ये एक ख्रिस्ती महिला गोड आणि समोरच्याला भूरळ पडेल, असे बोलून ख्रिस्ती धर्माचा प्रचार करत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. या व्हिडिओत संबंधित महिला मोठ्या आवाजात प्रवाशांना बायबलमधील विचार सांगताना दिसते; मात्र कुणीही पुढे येऊन सार्वजनिक ठिकाणी चालणार्या धर्मांतराच्या या प्रकाराला विरोध करत नाही. ‘जय महाराष्ट्र’ या वाहिनीने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
🚨 Panvel–CST Local: A Christian woman was seen openly preaching and quoting the Bible inside the train, and the video is now viral.
She speaks softly, but the intent is loud – public evangelism right inside Mumbai’s lifeline.
The big question:
👉 Will the same authorities who… pic.twitter.com/l3B0m0BwzD— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 15, 2025
१. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘बहुसंख्या प्रवासी हिंदु असतांना रेल्वे प्रशासनाने याची नोंद घेऊन ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणार्यांवर कारवाई करावी’, अशी मागणी अनेकांनी केली आहे. ‘बहुसंख्य हिंदु प्रवासी असलेल्या लोकलमध्ये असे वर्तन आक्षेपार्ह आणि मानसिक छळ करणारे आहे’, असेही काहींनी म्हटले आहे.
२. पुरुषांच्या डब्यात जाऊन ही महिला मोठमोठ्याने म्हणत आहे, ‘‘येशू जिवंत झाला आहे. येशूने माझे पाप, माझी लाज घेतली आहे. तो अनंत काळ जिवंत आहे. जो त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला स्वर्ग मिळाल. येशूला आपलेसे करा. त्याने सर्वांवर प्रेम केले आहे.’’ मागील सव्वा महिन्यापासून हे चालू असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
३. आणखी एक पुरुषही रेल्वेस्थानकात धर्मांतराविषयी बोलत असतो. नोकरीवर ठेवल्याप्रमाणे सरकारी जागेवर प्रतिदिन येथे काही जणांकडून धर्मांतर केले जात आहे. पूर्वी बंद ठिकाणी चालू असलेला धर्मप्रसार आता उघडपणे चालू आहे, असेही वृत्तात म्हटले आहे.
वरील प्रकारांमुळे पनवेलमधील ख्रिस्ती धर्मांतराचे सूत्र पुन्हा एकदा समोर आले आहे. सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या धार्मिक संवेदनांशी संबंधित व्यापक प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे.
संपादकीय भूमिका
|
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
IRCTC : ‘आय.आर्.सी.टी.सी.’चे नवीन संकेतस्थळ चालू : तिकीट आरक्षण होणार अधिक सोपे