
गुरुग्राम (हरियाणा) – जम्मू-काश्मीर पोलिसांनी उत्तरप्रदेशातील सहारनपूर येथून डॉ. अदिल अहमद राठर याला अटक केली होती. तो येथील रुग्णालयात आतंकवाद्यांची रहाण्याची व्यवस्था करत होता. त्याच्या चौकशीतून काश्मीरमधील अनंतनाग जिल्हा रुग्णालयातून एक असॉल्ट रायफल मिळाली.

पुढील चौकशीत पोलिसांना त्याचा साथीदार असणारा पुलवामा जिल्ह्यातील कोइल गावचा डॉ. मुजम्मिल शकील याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या हरियाणातील फरीदाबादमधील भाड्याने घेतलेल्या २ घरांवर धाड घालून एकूण २ सहस्र ९२३ किलो ‘अमोनियम नाइट्रेट’ हे स्फोटक, तसेच ए.के.-४७ रायफल आणि ८४ जिवंत काडतुसे जप्त करत त्याला अटक केली. एका घरातून ३६० किलो, तर फरीदाबादपासून ४ कि.मी. अंतरावरील फतेहपूर तगा गावातील दुसर्या घरातून २ सहस्र ५६३ किलो स्फोटकांचा साठा जप्त केला. हे घर एका मौलवीचे (इस्लामच्या धार्मिक नेत्याचे) असून त्याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांचा वापर कशासाठी केला होणार होता ? आणि त्यामागील जाळे कोणते आहे ?, यांचे अन्वेषण चालू आहे. डॉ. अदील अहमद राठर हा या देशात आतंकवादी कारवाया करण्याच्या कटाचा प्रमुख सूत्रधार आहे.
🚨 Terrorist Doctor Arrested in Faridabad; 360 kg Explosives Seized!
How did so much explosive reach Faridabad; just miles from Delhi? 🤯
Where were our border security forces & police?
Until the fanatic and radical mindset behind jihad is uprooted, terrorism in India will not… pic.twitter.com/ZCy07DqZ8Y
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 11, 2025
१. मुजम्मिल शकील याने ३ महिन्यांपूर्वी येथे भाड्याने खोली घेतली होती. तो तेथे रहात नव्हता; मात्र त्याने साहित्य ठेवले होते. या साहित्यांमध्येच शस्त्रसाठा आणि स्फोटक सापडले.
२. पोलीस या दोघांशी संबंधित जम्मू-काश्मीरमधील वैद्यकीय क्षेत्रातील संपर्क जाळे तपासत आहेत. तपासात असे संकेत मिळत आहेत की, या दोघांसमवेत आणखी काही डॉक्टरही बंदी घातलेल्या जिहादी आतंकवादी संघटनांशी, विशेषतः जैश-ए-महंमदशी, संबंधित असू शकतात. अन्वेषणानंतर या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

महिला डॉक्टर शाहिन शाहीद हिलाही अटक !डॉ. मुजम्मिल याची प्रेयसी डॉ. शाहिन शाहिद हिलाही पोलिसांनी या प्रकरणात लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथून अटक केली आहे. तिच्याच गाडीमध्ये पोलिसांना शस्त्रे सापडली होती. |
#WATCH | On a large quantity of IED-making material & ammunition recovered by J&K Police during investigation from Faridabad, Faridabad CP Satender Kumar says, "One assault rifle with 3 magazines and 83 live rounds, one pistol with 8 live rounds, two empty cartidges, two… pic.twitter.com/eBBKkqGpI5
— ANI (@ANI) November 10, 2025
काश्मीरमध्ये झडतीसत्र !
दोन्ही डॉक्टरांना अटक झाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर आतंकवादविरोधी मोहीम चालू केली आहे. ९ नोव्हेंबरला काश्मीर खोर्यात विविध ठिकाणी घेतलेल्या झडतीच्या वेळी एका महिलेसह ९ जणांना अटक करण्यात आली.
देहलीतील रा.स्व. संघाचे कार्यालय होते लक्ष्य !![]() सूत्रांच्या माहितीनुसार मोठ्या आतंकवादी कटाची कार्यवाही (अंमलबजावणी) करण्याची सिद्धता चालू होती. या कटामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला लक्ष्य करण्याचा विचार होता. |
आतापर्यंत ७ जणांना अटक !
या संपूर्ण प्रकरणात जम्मू-काश्मीर, उत्तरप्रदेश आणि हरियाणा या राज्यांमधून ७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात आरिफ निसार डार उपाख्य साहिल (नवगाम, श्रीनगर), यासिर-उल्-अशरफ (नवगाम, श्रीनगर), मकसूद अहमद डार उपाख्य शाहिद (नवगाम, श्रीनगर), मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) इरफान अहमद (शोपिया येथील मशिदीचा इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा)), जमीर अहमद अहंगर उपाख्य मुतलाशा (वाकुरा, गांदरबल), डॉ. मुजम्मिल अहमद गनई उपाख्य मुसैब (कोईल, पुलवामा) आणि डॉ. अदील (वानपोरा, कुलगाम) यांचा समावेश आहे.
स्फोटासाठी ‘अमोनियम नायट्रेट’चा होणार होता वापर !‘अमोनियम नायट्रेट’चा वापर शेतात खतासाठी केला जातो, तसाच तो खाणींमध्ये स्फोट घडवण्यासाठीही केला जातो. आतंकवादी याचा वापर पेट्रोल, डिझेल आदी इंधन तेलामध्ये मिसळून त्याचा स्फोट घडवण्यासाठी वापर करतात. ते सहज कुठेही नेता येत असल्याने याचा वापर केला जातो. |
संपादकीय भूमिका
|

म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !