० ते १० या आकड्यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांच्या संदर्भातील संशोधन !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संख्यांविषयीचे अमूल्य संशोधन

‘० ते १० या आकड्यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी प्रत्येक आकड्याची संगणकीय प्रत (टीप १) काढून त्यांच्या लोलकाने चाचण्या करण्यात आल्या. लोलकाने वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येते. या चाचण्यांतील कोणत्याही आकड्यात नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. या आकड्यांतील सकारात्मक ऊर्जेच्या नोंदी आणि आकड्यांतील अनुभूतीजन्य स्पंदनांचे प्रमाण सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सूक्ष्मातून काढले आहे.

टीप १ : प्रयोगासाठी मराठीतील संगणकाच्या ‘फाँट’मधील आकडे निवडण्यात आले.

१. ‘०’ ते ‘१०’ या आकड्यांतील सकारात्मक ऊर्जेच्या नोंदी आणि आकड्यांतील अनुभूतीजन्य स्पंदनांचे प्रमाण

वरील नोंदीवरून पुढील सूत्रे लक्षात येतात –

१. ‘०’ या आकड्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २७.४ मीटर आहे. ‘०’ या आकड्यातून शांतीची स्पंदने सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित होत आहेत.

२. ‘६’ या आकड्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १४.६ मीटर आहे. ‘६’ या आकड्यातून पाचही प्रकारची स्पंदने समप्रमाणात प्रक्षेपित होत आहेत.

३. अन्य आकड्यांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १५.३ मीटर ते २५.३ मीटर आहे. अन्य आकड्यांतून पाचही प्रकारची स्पंदने निरनिराळ्या प्रमाणात प्रक्षेपित होत आहेत.

१ अ. निष्कर्ष : प्रत्येक आकड्यातील सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण निरनिराळे आहे. याचे कारण हे की, प्रत्येक आकड्यातील शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या स्पंदनांचे प्रमाण निरनिराळे आहे. शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची स्पंदने उत्तरोत्तर अधिकाधिक सूक्ष्म होत जातात, म्हणजे ती अधिकाधिक प्रभावी होत जातात. अन्य आकड्यांच्या तुलेनत ‘०’ या आकड्यात शांतीची स्पंदने सर्वांत अधिक आहेत आणि त्यानुसार त्या आकड्याची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळही सर्वांत अधिक आहे. ‘६’ या आकड्यातील शांतीची स्पंदने सर्वांत अल्प आहेत आणि त्यानुसार त्या आकड्याची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळही सर्वांत अल्प आहे. अन्य आकड्यांतील शांतीची स्पंदने अल्प होऊन अन्य स्पंदनांचे प्रमाण, उदा. शक्ती, भाव, चैतन्य यांच्या स्पंदनांचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण निरनिराळे आहे.

आर्.एफ्.आय. (रेसोनेंट फिल्ड इमेजिंग)’ उपकरण

२. ‘०’ ते ‘१०’ या आकड्यांच्या ‘आर्.एफ्.आय.’ या उपकरणाद्वारे केलेल्या नोंदी 

‘आर्.एफ्.आय. (रेसोनेंट फिल्ड इमेजिंग)’ या उपकरणाद्वारे एखाद्या घटकाच्या (वस्तू, व्यक्ती इत्यादीच्या) ऊर्जाक्षेत्राची ‘फ्रिक्वेंसी’ (‘हर्टज्’ या एककामध्ये) मोजता येते. या उपकरणासमवेत दिलेल्या ‘फ्रिक्वेंसी’च्या तक्त्यावरून ‘कोणती फ्रिक्वेंसी कोणत्या विशिष्ट रंगाशी संबंधित आहे’, ते समजते. या तक्त्यात एकूण १६ रंग दिले आहेत.

२ अ. प्रत्येक रंगातील त्रिगुणांचे प्रमाण : हे प्रमाण सद्गुरु डॉ. गाडगीळकाका यांनी सूक्ष्मातून काढून दिले आहे.

२ आ. ‘आर्.एफ्.आय. (रेसोनेंट फिल्ड इमेजिंग)’ या उपकरणाद्वारे ‘०’ ते ‘१०’ या आकड्यांच्या मोजलेल्या ‘फ्रिक्वेंसी’ आणि त्यांच्याशी संबंधित विशिष्ट रंग

टीप २ : आकड्यांतील सगुण-निर्गुण तत्त्वाचे प्रमाण आणि सत्त्व, रज अन् तम गुणांचे प्रमाण सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सूक्ष्मातून काढून दिले आहे.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

वरील नोंदीवरून पुढील सूत्रे लक्षात येतात –

१. प्रत्येक आकड्याची ‘फ्रिक्वेंसी’ निराळी आहे.

२. आकड्यांच्या ‘फ्रिक्वेंसी’शी संबंधित असलेले मोरपिशी निळा, हिरवा, पिवळा, निळा आणि सोनेरी हे रंग उत्तरोत्तर अधिक सात्त्विकता दर्शवतात.

३. प्रत्येक आकड्यातील सगुण आणि निर्गुण तत्त्वांचे प्रमाण आणि सत्त्व, रज अन् तम गुणांचे प्रमाण निरनिराळे आहे.

४. ‘०’ या आकड्यातील निर्गुण तत्त्व आणि सत्त्वगुण यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानुसार त्या आकड्याच्या ‘फ्रिक्वेंसी’ संबंधित रंग सोनेरी मिळाला आहे आणि तो अधिक सत्त्वगुणी रंग आहे. (‘सूत्र २ अ’मधील सारणी पहावी.)

५. ‘१०’ या आकड्यातील निर्गुण तत्त्व आणि सत्त्वगुण यांचे प्रमाण सर्वांत अल्प आहे. त्यानुसार त्या आकड्याच्या ‘फ्रिक्वेंसी’शी संबंधित रंग मोरपिशी निळा मिळाला आहे आणि सोनेरी, निळा, पिवळा अन् हिरवा या रंगांपेक्षा मोरपिशी निळा या रंगामध्ये सत्त्वगुण अल्प आहे. (‘सूत्र २ अ’मधील सारणी पहावी.)

सौ. मधुरा धनंजय कर्वे

२ अ. निष्कर्ष : प्रत्येक आकड्याची ‘फ्रिक्वेंसी’ निरनिराळी आहे. याचे कारण हे की, प्रत्येक आकड्यातील सगुण आणि निर्गुण तत्त्वांचे प्रमाण आणि सत्त्व, रज अन् तम या गुणांचे प्रमाण निरनिराळे आहे. आकड्यातील निर्गुण तत्त्व जेवढे अधिक आणि सत्त्वगुणही जेवढा अधिक तेवढा त्या आकड्याच्या ‘फ्रिक्वेंसी’शी संबंधित रंग अधिक सत्त्वगुणी मिळतो. ‘०’ ते ‘१०’ या आकड्यांपैकी ‘०’ या आकड्यात निर्गुण तत्त्व आणि सत्त्वगुण यांचे प्रमाण सर्वाधिक आहे अन् ‘१०’ या आकड्यातील निर्गुण तत्त्व आणि सत्त्वगुण यांचे प्रमाण सर्वांत अल्प आहे.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१९.९.२०२५)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक