तालिबानवरून पाकच्या संसदेत परराष्ट्रमंत्री इशाक डार यांची सैन्य आणि तत्कालीन इम्रान खान सरकार यांच्यावर टीका

इस्लामाबाद (पाकिस्तान) – अफगाण तालिबानशी वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारवर आणि त्या काळच्या सैन्य नेतृत्वावर आरोप केला. डार यांनी म्हटले की, वर्ष २०२१ मध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’चे (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा) तत्कालीन प्रमुख फैज हमीद यांनी केलेला काबुल दौरा हा देशात वाढलेल्या आतंकवादी घटनांचे मूळ कारण आहे. त्यांनी तेथे प्यायलेला एक कप चहा आम्हाला फार महागात पडला. त्या एक कप चहामुळे पाकिस्तान-अफगाण सीमांचे दार पुन्हा उघडले गेले आणि त्या काळातील सरकारने १०० पेक्षा अधिक कुख्यात गुन्हेगारांना तुरुंगातून सोडले. या निर्णयांमुळेच देशात आतंकवादी आक्रमणांचा पूर आला असून त्यासाठी माजी सरकार थेट उत्तरदायी आहे.
☕ “That one cup of tea in Kabul cost Pakistan dearly!” 🇵🇰💥
FM Ishaq Dar blames Imran Khan & Pak Army for Taliban mess; says the Kabul visit led to border reopening, release of 100+ terrorists & a surge in attacks across Pakistan!#AfghanistanPakistanWar
Video Courtesy:… pic.twitter.com/Je8C9ttofa— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 7, 2025
डार यांचे हे विधान अशा काळात आले आहे, जेव्हा गेल्या महिन्यात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सीमारेषेवर सशस्त्र संघर्ष झाला होता.
कतार आणि तुर्कीये यांच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे, जो सध्या लागू आहे; मात्र सीमेजवळ तणाव कायम आहे.
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !