
वॉशिंग्टन (अमेरिका) – उत्तर कोरिया, चीन आणि रशिया अणूचाचण्या करत आहेत. पाकिस्तानही अणूचाचण्या करत आहे. इतर देश अणुचाचण्या करतात; म्हणून आम्हीही अणूचाचण्या करू, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत केले.
गेली अनेक वर्षे अमेरिकेने अणूचाचण्या केलेल्या नाहीत. रशिया आणि अमेरिका यांच्यासह अन्य देशांनी ठरवल्याप्रमाणे या चाचण्या बंद करण्यात आल्या होत्या. रशियाने स्पष्टीकरण देतांना म्हटले की, त्याने अणूबाँबची चाचणी केलेली नाही.
💥 “Trump’s Silence on Pakistan’s Nukes: A Double Standard Explodes” 💥
🚨 Donald Trump claims Pakistan is conducting nuclear tests, warning that “the world is in danger” as nations race to test nukes
❓ If the US truly knows Pakistan is testing nukes, why no sanctions like… pic.twitter.com/eo9cRTRNaY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 3, 2025
सर्व देश अणूचाचण्या करत असल्यामुळेच जगाला धोका !
ट्रम्प पुढे म्हणाले की, हे देश भूमीगत अणूचाचण्या करतात आणि त्याची माहिती कुणालाही मिळत नाही; पण अमेरिकेत समाजरचना पारदर्शक असल्यामुळे तिथे सरकारला पारदर्शकपणे माहिती द्यावी लागते, अन्यथा माध्यमे त्यावर स्वतःच चर्चा चालू करतात; परंतु इतर देशांच्या अणूचाचण्या पूर्णपणे गुप्त असतात, त्यामुळे ते त्याविषयी काहीही बोलत नाहीत. अमेरिका आता अणूबाँबची चाचणी घेईल. जगात सर्वाधिक अण्वस्त्रे आमच्याकडे आहेत. सर्व देश अणूचाचण्या करत असतील, तर त्यामुळे जगाला धोका आहे. त्यामुळे इतर कुणीही याविषयी बोलत नसले, तरी आम्ही बोलणार आहोत. अण्वस्त्रांमध्ये अमेरिका सर्वांत प्रगत असला, तरी अणूचाचण्या करणे आवश्यक आहे.
भारताने अणूचाचणीची संधी घ्यावी ! – संरक्षण तज्ञ
काही भारतीय संरक्षण तज्ञांचे मत आहे की, जर अमेरिका, रशिया आणि चीन यांनी पुन्हा अण्वस्त्र चाचण्या चालू केल्या, तर भारतालाही स्वतःच्या हायड्रोजन बाँबची पुन्हा चाचणी करण्याची संधी निर्माण होईल. भारत नव्या अधिक शक्तीशाली, तसेच लहान क्षेपणास्त्रे यांसाठी आवश्यक शस्त्रांची पडताळणी करू शकेल.
प्रा. हॅपिमॉन जेकब यांनी सामाजिक माध्यमांत लिहिले की,
Should the U.S. resume nuclear testing, India must seize the opportunity to conduct its own
thermonuclear tests, thus validating its deterrent & putting an end to lingering doubts about the success of the 1998 thermonuclear tests. pic.twitter.com/s2WzG2Tp0F— Happymon Jacob (@HappymonJacob) October 31, 2025
India Needs a Strategic Reorientation.
In a 14-minute video, I outline key steps India should take for a strategic reorientation.
Watch here: https://t.co/OqrmswjByS@IndiasWorld_mag
— Happymon Jacob (@HappymonJacob) October 31, 2025
जर अमेरिकेने अण्वस्त्रांची चाचणी चालू केली, तर भारतानेही ही संधी साधून स्वतःच्या अणूचाचण्या करायला हव्यात.
पाकच्या अणूचाचण्यांमुळे भूकंप ?
याच वर्षी एप्रिल आणि मे महिन्यांत पाकिस्तानमध्ये सलग अनेक लहान भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या वेळी असा दावा केला गेला होता की, पाकिस्तान भूमीगत अणूचाचण्या करत आहे. ३ दिवसांच्या कालावधीत आलेल्या या धक्क्यांमुळे अणूचाचण्यांविषयी चर्चा चालू झाली होती. भूकंपाचे हे झटके पाकिस्तानच्या उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील भागात जाणवले. त्या वेळी काही तज्ञांनी पाकिस्तान गुप्त अणूचाचण्या करत असल्याची शक्यता व्यक्त केली होती. पहलगामवरील आक्रमणानंतर जेव्हा भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला होता, तेव्हाही असे दावे करण्यात आले की, पाकिस्तान किराना हिल्ससारख्या भागांमध्ये भूमीगत अणूचाचणी करत आहे; मात्र या दाव्यांची अधिकृत पुष्टी कधीच झाली नाही आणि पाकिस्तान सरकारनेही याविषयी कोणतीही स्वीकृती दिली नव्हती.
संपादकीय भूमिका
|
मुलींमध्ये शौर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक ! – प्रा. (सौ.) ज्योती वाघमारे, खासदार, शिवसेना
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकार्यांची नियुक्ती !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
Corporate Jihad : धर्मांतरास नकार दिल्याने ‘Wipro’च्या हिंदु महिलेला नोकरीवरून काढले !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला