
श्रीकाकुलम् (आंध्रप्रदेश) – येथील काशीबुग्गा व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १० भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले आहेत. अधिकार्यांनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. स्थानिक प्रशासनाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून ‘गर्दी नियंत्रणात कुठे चूक झाली’, हे शोधण्याचा प्रयत्न चालू आहे.
Tragedy in Andhra Pradesh: Stampede at Kasibugga Venkateswara Swamy Temple claims 10 lives.
Repeated stampedes at Hindu temples are deeply shameful and heartbreaking.
It’s time for a national-level safety plan to protect devotees during major festivals and gatherings.
PC:… pic.twitter.com/BNJdvoXgsi
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 1, 2025
१. येथे कार्तिक महिन्यातील एकादशीनिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती. मंदिर परिसराच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक गर्दीचा दबाव वाढला, ज्यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. अनेक जण खाली कोसळले आणि त्यांच्या अंगावरून अनेकांनी जाण्यास चालू केले.
२. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सकाळपासूनच मंदिरात गर्दी वाढली होती आणि पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसल्यामुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेली.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक !
आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री एन्. चंद्रबाबू नायडू यांनी म्हटले की, या दुर्दैवी घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे मी अत्यंत दुःखी आहे. मी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो. मी अधिकार्यांना घायाळांना शक्य तितके उत्तम उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. मी स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना घटनास्थळी भेट देऊन साहाय्य कार्याचे निरीक्षण करण्यास सांगितले आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या मंदिरात, धार्मिक स्थळी सातत्याने होणार्या अशा प्रकारच्या घटना लज्जास्पद म्हणाव्या लागतील ! या संदर्भात देशपातळीवर उपायोजना काढणे आवश्यक आहे ! |
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रहित !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती