|

नवी देहली : सर्वोच्च न्यायालयाचा वर्ष २०१९ चा अयोध्या रामजन्मभूमीचा निकाल अवैध घोषित करण्याची मागणी करणारी याचिका अधिवक्ता मेहमूद प्राचा यांनी प्रविष्ट केली होती. ही याचिका देहली जिल्हा न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली, तसेच अधिवक्ता मेहमूद प्राचा यांनी अयोध्या प्रकरणाच्या निकालाविषयी प्रविष्ट केलेला खटला फेटाळण्याचा दिवाणी न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. यासह दिवाणी न्यायालयाने याचिकादाराला ठोठावलेला १ लाख रुपयांचा दंड वाढवून जिल्हा न्यायालयाने तो ६ लाख रुपये केला.

१. अधिवक्ता मेहमूद प्राचा यांनी त्यांच्या याचिकेत दावा केला होता की, भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (अयोध्या प्रकरणाचा निर्णय घेणार्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठातील ५ न्यायमूर्तींपैकी एक) यांनी गेल्या वर्षी एका भाषणात स्वीकृत केले होते की, अयोध्या निकाल भगवान श्रीरामलल्ला विराजमान यांनी त्यांना दिलेल्या तोडग्यानुसार देण्यात आला होता.
🚨 Delhi Court slams Advocate Mehmood Pracha!
His plea to overturn the Supreme Court’s landmark Ayodhya Ram Janmabhoomi verdict has been dismissed.
💥 Court calls it a “frivolous and abusive” petition and imposes a ₹6 lakh fine.
PC: @LawChakra pic.twitter.com/UFOScTParY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 27, 2025
२. जिल्हा न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी अधिवक्ता मेहमूद प्राचा यांचा खटला, म्हणजे ‘क्षुल्लक, चुकीचा समज आणि न्यायिक प्रक्रियेचा गैरवापर करणारा आहे’, असे म्हटले आहे.
३. जिल्हा न्यायाधीश राणा यांनी अयोध्या निकाल आणि माजी सरन्यायाधीशांच्या भाषणातील उतारे न्यायालयात पुन्हा सादर केले अन् असा निष्कर्ष काढला की, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ‘देवासमोर प्रार्थना’ करण्याचा केलेला संदर्भ हे आध्यात्मिक प्रतिबिंब होते, पक्षपात किंवा बाह्य हस्तक्षेप यांची स्वीकृती नाही.
४. ‘सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांच्या भाषणात श्रीरामलल्लाचा संदर्भ दिला नाही, तर अयोध्या प्रकरणातील तोडग्यासाठी देवाकडे प्रार्थना केली’, असे म्हटल्याचे न्यायाधीश राणा यांनी स्पष्ट केले.

५. न्यायाधीश राणा यांनी पुढे सांगितले की, वैयक्तिक श्रद्धेने दैवी मार्गदर्शन मिळवणे, हे कायद्यानुसार ‘फसवणूक’ असू शकत नाही. अधिवक्ता मेहमूद प्राचा यांनी त्यांच्या याचिकेत ‘माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना देवाचे ‘पुढचे मित्र’ म्हणून चुकीचे स्थान दिले होते’, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !