
ढाका (बांगलादेश) – पाकिस्तानी जनरल साहिर शमशाद मिर्झा यांना बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांनी एक नकाशा भेट दिला. यामध्ये भारताच्या ईशान्येकडील राज्यांना बांगलादेशाचा भाग म्हणून दाखवण्यात आले आहे. युनूस यांनी मिर्झा यांना ‘द आर्ट ऑफ ट्रायम्फ’ नावाचे पुस्तक भेट दिले. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर बांगलादेशाचा नकाशा छापण्यात आला आहे. यात भारताची ईशान्येकडी ७ राज्ये बांगलादेशाचा भाग म्हणून दाखवण्यात आली आहेत. हा नकाशा कट्टरपंथी इस्लामी गट ‘ग्रेटर बांगलादेश’ म्हणून ओळखतात. या प्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप अधिकृतपणे भाष्य केलेले नाही.
🚨 Shocking Provocation
Bangladesh’s interim head Muhammad Yunus gifts a map to Pakistan’s Gen. Sahir Shamshad Mirza, showing India’s 7 Northeast states as part of Bangladesh 😡
Such audacity from Dhaka shows how India’s silence is being mistaken for weakness. Time for a firm… pic.twitter.com/7PxE9Re1Ls
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 28, 2025
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये महंमद युनूस यांचे सल्लागार महफुज आलम यांनी बांगलादेशाचा चुकीचा नकाशा पोस्ट केला होता. या नकाशात महफुज आलम यांनी भारताच्या बंगाल, त्रिपुरा आणि आसाम या राज्यांचे काही भाग बांगलादेशामध्ये असल्याचे दाखवले होते. याला विरोध झाल्यानंतर ही पोस्ट हटवली होती.
|
|
संपादकीय भूमिकाभारत सरकार बांगलादेशाच्या संदर्भात निष्क्रीय असल्याने त्याचे धाडस प्रतिदिन वाढत आहे, हेच या घटनेतून लक्षात येते ! |

Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan