उद्योग हीच साधना !
‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित लेखमाला !
‘उद्योग हीच साधना’ या लेखमालिकेच्या मागील ३ भागांत आपण उद्योजकांसाठी आध्यात्मिक साधना, तसेच हिंदु राष्ट्राच्या शंखनाद महोत्सवाच्या अनुभूतींविषयी थोडे चिंतन केले. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘प्रथम सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘उद्योग ही साधना’, असा दृष्टीकोन देणे, धर्मशास्त्रातील गृहस्थाश्रम आणि ब्रह्मचर्याश्रम यांचे महत्त्व, तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कर्मसिद्धांताचे केलेले मार्गदर्शन’, यांविषयी वाचले. आजच्या लेखाच्या या भागात ‘उद्योजकांनी उद्योग कसा वाढवावा आणि साधना कशी करावी’, यांविषयी आपण जाणून घेऊया.
(भाग ४)
लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि., ठाणे.
भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/966211.html

१. ‘कर्मफळ आनंदाने स्वीकारणे’, हे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाचे सार !
१ अ. परिस्थिती ही आपल्या कर्म फळाचे परिणाम असल्याने कुणाला दोष देऊ नये : आपणच केलेल्या कर्मची फळे आपणच भोगतो. ती सुखाची असो किंवा दु:खाची, त्यामुळे त्या परिस्थितीची तक्रार न करता ते कर्मफळ आनंदाने स्वीकारले पाहिजे. सनातन संस्थेच्या मार्गदर्शननानुसार यात जीवनाचे खरे तत्त्व समाविष्ट आहे. हेच आपल्या धर्म चे आणि तत्त्वज्ञानाचे सार आहे. आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून परमेश्वर, आई-वडील किंवा इतर यांना दोष देऊ नये; कारण हे सगळे आपल्या स्वतःच्या कर्मफळाचे परिणाम असतात. जर मागील जन्मात आपण मनापासून मेहनत आणि साधना केली असती, दानधर्म किंवा व्यवसाय प्रामाणिकपणे केला असता, तर आज त्याचे चांगले परिणाम मिळाले असते.
१ आ. काही कर्मचे फळ त्वरित, तर काही कर्मचे फळ थोड्या कालावधीनंतर मिळणे : कर्मफलाचा न्याय अगदी अचूक असतो. काही कर्मची फेड त्वरित होते, तर काहींची काही काळानंतर आणि काहींची फेड पुढच्या जन्मासाठी पुढे ढकलली जाते, उदा. रस्त्यावर चालतांना चुकून एखाद्याच्या पायावर पाय पडला, तर तो माणूस लगेच रागावतो. आपल्याला अपशब्द उच्चारतो. तेच आपल्याला मिळालेले तात्काळ कर्म फळ. कार्यालयामध्ये जर आपण कुणाला दुखावले, तर त्याचे फळ थोड्या काळानंतर मिळते, ते कधी कामातून, तर कधी नात्यातून. अशा प्रकारे जीवनात घडणारे प्रत्येक सुख-दु:ख हे आपल्या कर्म चे फळ असून यातून आपल्याला योग्य शिकवण मिळते. हेच सनातन संस्थेने सांगितले आहे.
आम्हीही ‘ऍग्री केअर’ (कृषीविषयक काळजी घेणारा विभाग) विभागाच्या माध्यमातून झाडे लावतो. कितीही मेहनत घेतली, तरी आंब्याला वर्षभरानंतरच फळे येतात. काही झाडांना पटकन फुले-फळे लागतात, तर काहींना ६ मासांनी, तर काहींना वर्षभराने. त्याचप्रमाणे आपल्या कर्मांची फळे मिळायलाही वेळ लागतो. कधी लगेच, कधी उशिरा, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
१ इ. कर्मांच्या हिशोबानुसारच विशिष्ट परिस्थितीत मनुष्य जन्माला येणे : ‘परमेश्वर’ हा खरा ‘सुपर कॉम्प्युटर’ (परमसंगणक) आहे. तो प्रत्येक मनुष्याला जन्माला घालतांना त्याच्या कर्मांचा हिशोब पहातो. त्या व्यक्तीला त्याच्या कर्मांची या जन्मात अधिकाधिक परतफेड कशी करता येईल आणि त्याची आध्यात्मिक उन्नती कशी होईल, याचा विचार करूनच तो त्या व्यक्तीला विशिष्ट आई-वडिलांच्या पोटी जन्माला घालतो. त्यामुळे आई-वडील, कुटुंब, परिस्थिती हे सगळे आपल्या कर्मांनुसारच ठरलेले असते; म्हणून त्यांना दोष न देता उलट कृतज्ञता व्यक्त करायला हवी. हे जेवढे लवकर समजेल, तेवढे आपण तक्रार करणे थांबवू शकतो आणि स्वतःची ऊर्जा योग्य दिशेने व्यय करू शकू.
१ उ. जीवनातील घटना प्रारब्ध आणि प्रयत्न यांवर अवलंबून असणे : सनातन संस्थेने सांगितल्याप्रमाणे कलियुगात आपल्यासमवेत जे काही घडते, त्यातील ६५ टक्के भाग हा मागील जन्मातील कर्मफळांमुळे घडतो, तर ३५ टक्के गोष्टी क्रियमाणावर, म्हणजेच प्रयत्नांवर अवलंबून असतात. आपण कुणाच्या पोटी जन्म घेणार ?, कोणत्या धर्मात, कुठल्या देशात किंवा समाजात जन्माला येणार ?, आपण दिसणार कसे ? हे सगळे त्या ६५ टक्क्यांमध्ये येते. या सगळ्या आपल्या मालमत्ता (ॲसेट्स) आहेत आणि त्याचा वापर आपण आयुष्यात कसा करतो, ते म्हणजे स्वतःची कृती त्या ३५ टक्क्यांमध्ये येते. यावरच स्वतःचे यश, सन्मान आणि प्रगती अवलंबून असते. हा सिद्धांत समजून घेतला, तर माणूस स्वतःचे आयुष्य अधिक समाधानाने जगू शकतो.

२. उद्योगासाठी पंचज्ञानेंद्रिये, मन आणि आत्मशक्ती यांची आवश्यकता !
मला असे जाणवले की, ज्यांना सौंदर्य लाभले आहे, ते अभिनयाच्या क्षेत्रात यशस्वी होतात. ज्यांच्याकडे बुद्धीमत्ता आहे, ते शिक्षणात प्रगती करतात आणि मोठे अधिकारी किंवा संशोधक बनतात. ज्यांची शारीरिक क्षमता उत्तम आहे; पण बुद्धीमत्तेचा भाग अल्प आहे, ते खेळांमध्ये चमकतात आणि याचे वेगवेगळे मिश्रण, म्हणजे बुद्धी अन् सौंदर्य, बुद्धी, तसेच शक्ती असलेले लोक विविध क्षेत्रांत पुढे जातात. महत्त्वाचे म्हणजे आपल्यात वेगळे आणि खास काय आहे, हे ओळखण्याची आवश्यकता आहे. ग्रहांच्या माध्यमातून, म्हणजेच ज्योतिषाच्या साहाय्याने आपण ही दिशा शोधू शकतो. तथापि उद्योग करण्यासाठी या सर्व गोष्टी म्हणजेच सौंदर्य, बुद्धी, शक्ती असणे आवश्यक नाही; कारण परमेश्वराने प्रत्येकाला पंचज्ञानेंद्रिये, मन आणि आत्मशक्ती समान दिलेली आहे. याच आधारावर माणूस स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह सुखाने करू शकतो.
३. जे आपल्याकडे नाही, ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे !
‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’, असे म्हटले आहे, म्हणजेच जे आपल्याकडे नाही, त्याविषयी खंत करण्याऐवजी ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शारीरिक क्षमता नसेल, तर ती व्यायाम करून मिळवता येते. बुद्धी अल्प असेल, तर अभ्यास करून वाढवता येते. सौंदर्य अल्प असेल, तर नीटनेटके राहून, चांगले कपडे घालून वाढवता येते. या सगळ्या गोष्टी आपल्या ३५ टक्के प्रयत्नांमध्ये येतात.
४. प्रत्येकाने स्वतःची आवड लक्षात घेऊन क्षेत्र निवडल्याने यशस्वी होण्याची शक्यता
स्वतःची प्रवृत्ती बहुधा दुसर्यांकडे बघण्याची असते, बाह्यदृष्टी अधिक, अंतर्दृष्टी अल्प; म्हणून प्रत्येकाने स्वतःची ‘स्वोट ॲनालिसिस’(SWOT analysis (Strength (सामर्थ्य), Weakness (दुर्बलता), Opportunity (सुसंधी), Threat (धोके) – व्यवसायाची सद्यःस्थिती आणि वातावरण यांचे विश्लेषण करण्यासाठी अन् भविष्यातील धोरणे ठरवण्यासाठी वापरले जाणारे एक साधन) करून घ्यायला हवे. आई-वडिलांनीही आपल्या मुलांचे ‘स्वोट ॲनालिसिस’ करण्यास प्राधान्य द्यायला हवे. एखाद्याला चित्रकलेची आवड असेल, एखाद्याला रसायनशास्त्र, खाद्यपदार्थ, यांत्रिक (मेकॅनिकल) क्षेत्र आवडेल, तर एखाद्याला गणित किंवा आकडेमोड चांगली जमेल. मुले ही आई-वडिलांचे अनुकरण करतात, त्यामुळे घरातील वातावरणाचा त्यांच्या मनावर खोल परिणाम होतो. परिणामी घरातील वातावरण सकारात्मक आणि आनंदी, त्याचप्रमाणे योग्य संवादाने परिपूर्ण असावे. याखेरीज लहानपणीच मुलांनी स्वतःची आवड, स्वतःचा कल लक्षात घेऊन पुढे करिअर केल्यास, तसेच त्यांच्या आवडीचा व्यवसाय निवडला, तर ते नक्कीच त्या क्षेत्रात यशस्वी होतात.
५. सनातन संस्थेच्या ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या साधनेच्या नियमानुसार स्वतःचे कार्यक्षेत्र शोधणे
५ अ. स्वतःच्या कामात सातत्य राखल्यास प्रगती शक्य ! : सनातन संस्थेने सांगितलेल्या ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या आध्यात्मिक साधनेच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाची आवड, वृत्ती आणि कौशल्य वेगवेगळे असते; म्हणूनच आपण आपल्या प्रकृतीनुसार काम निवडले पाहिजे. साधारणपणे २१ व्या वर्षांनंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी किंवा व्यवसायाला आरंभ होतो. पुढील ४० ते ६० वर्षांपर्यंत आपण त्या कार्यात सातत्य ठेवले पाहिजे. धरसोड किंवा वारंवार पालट केल्यास प्रगती साधता येत नाही.
५ आ. स्वतःतील कौशल्य वापरून काहीतरी नवीन करणे महत्त्वाचे ! : कला शिकला असाल, त्यातील अर्थशास्त्र किंवा लेखाविषयक शिकलो असू, तर लेखामध्ये (‘अकाऊंट्स’मध्ये) अशा आपल्या विषयात सातत्य ठेवून त्यातच प्राविण्य मिळवावे. कौशल्य वाढवत राहिले, ज्ञान अधिक सखोल केले, तर आपण ‘स्थुलातून सूक्ष्माकडे’ वाटचाल करतो. एका विषयात गती मिळवली की, वेगळे मौलिक ज्ञान आपोआप प्राप्त होते. आरशात आपण स्वतःकडे पहातो, तेव्हा ‘आपण वेगळे आहोत’, असा आत्मविश्वास आपल्यात जागृत व्हायला हवा. तसे प्रत्येकाने आपल्यातील वेगळेपण ओळखले पाहिजे. एकाच प्रकारचे उत्पादन सगळे विक्री करू लागले, तर कुणालाच वाढीव किंमत मिळणार नाही. त्याची किंमत समानच रहाते; पण काहीतरी वेगळे निर्माण केले, नावीन्य आणले, तर त्याला अधिक किंमत मिळते.
वाचकांना सूचना
या लेखाविषयी वाचकांनी अभिप्राय कळवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा दू.क्र. (०२२) ६७०३५५५५ यावर संपर्क साधावा.
६. स्वयंपूर्ण भारत आणि उद्योजकांचे सामर्थ्य
६ अ. नोकर्या निर्माण करणे, हे उद्योजकांचे ध्येय हवे ! : ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तेवढे साधनामार्ग’, या अध्यात्मातील नियमानुसार प्रत्येकाने स्वतःचा मार्ग शोधला पाहिजे. शिक्षण आणि अनुभव यांतून सतत नवीन शिकत रहाणे आवश्यक आहे. नोकरीतही कंपनीच्या अपेक्षांप्रमाणे काम करून नवे प्रयोग करत राहिल्यास प्रगती निश्चित होते. परमेश्वराने स्वतःला दिलेली बुद्धी वापरून आपण नवीन गोष्टी निर्माण केल्या, तर त्यातून वेगळे यश आणि मोबदला मिळतो. लोकमान्य टिळक म्हणाले तसे ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, तसेच ‘नोकर्या निर्माण करणे, हे उद्योजकांचे ध्येय असले पाहिजे !’
६ आ. स्वयंपूर्ण भारत बनवण्यासाठी अधिक उद्योजक सिद्ध झाल्यास देशाचे परावलंबित्व न्यून होईल : देशाच्या प्रगतीचे खरे सामर्थ्य हे नव्या नोकर्या निर्माण करणार्या उद्योजकांमध्ये असते. जितके अधिक उद्योजक सिद्ध होतील, तितके परावलंबित्व न्यून होईल आणि राष्ट्र अधिक सक्षम बनेल. पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ‘स्वयंपूर्ण भारत’, म्हणजे कोणत्याही वस्तूंसाठी परदेशांवर अवलंबून रहायचे नाही; कारण परकीय चलनातून आयात केल्याने देशाची आर्थिक हानी होते. सध्या १ डॉलर सुमारे ८८.७७ रुपये इतका झाला आहे. त्यामुळे जेव्हा आपण परदेशातून वस्तू घेतो, तेव्हा ती डॉलरमध्ये घेतल्याने आपले परकीय चलन खर्ची पडते.
६ इ. भारताने शिक्षणात स्वयंपूर्ण होणे महत्त्वाचे ! : या धर्तीवर मोदी सरकारने चांगले पाऊल उचलले. पेट्रोलमध्ये इथेनॉल २० टक्के मिसळण्यास आरंभ केला. यामुळे भारताने परकीय चलन वाचवले आहे. या निर्णयामुळे भारताचे जवळपास १ लाख १३ सहस्र कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले, तसेच पर्यावरणालाही मोठा लाभ झाला. शिक्षणातही आपल्याला स्वयंपूर्ण बनायचे असेल, तर काही ठोस पावले उचलावी लागतील. आपल्या समाजात शिक्षणासाठी आरक्षणाची मागणी होते; पण त्यामागचे मूळ कारण, म्हणजे शिक्षणाच्या संधींची कमतरता. जर आपणच नवीन शिक्षण संस्था उभ्या केल्या, तर सर्वांना समान शिक्षण मिळू शकेल. मोदींनी ‘आयआयटी’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – भारतीय तंत्रज्ञान संस्था) आणि ‘आय.आय.एम्.’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजटमेंट – भारतीय व्यवस्थापन संस्था) यांसारख्या संस्थांची संख्या वाढवणे, हीच खरी उद्यमशीलता आहे. असे झाल्यास आरक्षणाची आवश्यकताच पडणार नाही.
६ ई. तरुणांनी व्यवसायाकडे वळणे, म्हणजे राष्ट्र स्वावलंबी होण्याकडे वाटचाल होय ! : सरकारी नोकर्या आता न्यून होत आहेत. त्यामुळे नवीन नोकर्या निर्माण करणे, ही काळाची आवश्यकता आहे. जर तरुणांनी पदवीचे शिक्षण झाल्यावरच एखादा व्यवसाय चालू केला, तर लग्नानंतर त्यांना स्थैर्य लाभेल आणि पुढील आयुष्य अधिक स्थिर होईल. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तेवढे साधनामार्ग’ या अध्यात्माच्या नियमानुसार जर एखाद्याला आपल्या आवडीचा व्यवसाय ४० वर्षे यशस्वीपणे चालवायचा असेल, तर त्याच क्षेत्रात सखोल ज्ञान मिळवणे आवश्यक आहे. असे केल्याने रोजगारनिर्मिती होईल, राष्ट्र स्वावलंबी बनेल आणि लोक परावलंबित्वातून बाहेर पडून आत्मनिर्भरतेकडे, स्वयंपूर्ण होण्याकडे वाटचाल करतील, तसेच आपण स्वतःसाठीच नव्हे, तर समाजासाठी अन् देशासाठीही प्रगतीचा मार्ग निर्माण करू शकतो.
उद्योग हीच साधना आहे आणि गृहस्थाश्रमातील शिक्षणपद्धत ही यशस्वी उद्योजक निर्मितीसाठी किती महत्त्वाची आहे, हे आपण या भागात पाहिले. उद्योजकतेच्या वाटचालीत केवळ व्यावसायिक कौशल्य पुरेसे नाही, तर संस्कार, नीतीमत्ता अन् व्यवस्थापनाचे सखोल शिक्षणही तितकेच आवश्यक आहे. हे सर्व ज्ञान मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने मिळाले. त्यांची कृपा आणि सूक्ष्मातील मार्गदर्शन नसते, तर हे ज्ञान मला प्राप्त होऊ शकले नसते. त्यामुळेच आता मी हे ज्ञान स्वतःपर्यंतच मर्यादित न ठेवता समाजात आणि राष्ट्रात त्याचा प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ‘हे ज्ञान देण्याची संधी मला प्राप्त झाली’, यासाठी मी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कोटीशः वंदन करतो आणि सनातन संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.’
(क्रमश: पुढच्या रविवारी)
– डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि., ठाणे.
भाग ५ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/972716.html
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !