भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला पुन्हा एकदा सुनावले !

न्यूयॉर्क (अमेरिका) – आम्ही पाकिस्तानला आवाहन करतो की, त्यांनी पाकिस्तानच्या बेकायदेशीर कह्यात असलेल्या भागांमध्ये (पाकव्याप्त काश्मीरमध्ये) चालू असलेले मानवी अधिकारांचे उल्लंघन तात्काळ थांबवावे. तेथील जनता पाकिस्तानी सैन्याचे नियंत्रण, दडपशाही, क्रौर्य यांच्या विरोधात उघडपणे बंड पुकारत आहे, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला पुन्हा एकदा सुनावले. पाकने जम्मू-काश्मीरचा विषय मांडल्यानंतर भारताने पाकला सुनावले.

येथील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी पी. हरिश यांनी म्हटले की, जम्मू-काश्मीर भारताचा अभिन्न आणि अविभाज्य भाग होता, आहे अन् कायम राहील. जम्मू-काश्मीरमधील लोक भारताच्या लोकशाही परंपरांनुसार आणि घटनात्मक चौकटीत राहून मूलभूत अधिकारांचा वापर करतात. या संकल्पना पाकिस्तानसाठी परक्या आहेत, असा टोलाही हरिश यांनी लगावला.
🇮🇳 India slammed Pakistan at the UN Security Council for human rights violations in Pakistan-occupied Kashmir (PoK).
📢 Pakistan must immediately stop its atrocities in PoK.
But let’s be honest; words won’t work anymore. It’s time to speak to Pakistan in the language it… pic.twitter.com/6tBlKlqwqH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 26, 2025
संपादकीय भूमिकापाकला शब्दांच्या भाषेत कितीही सुनावले, तरी त्याचा काहीही लाभ होणार नाही. ते पालथ्या घड्यावरील पाणीच असेल. पाकला ज्या भाषेत समजते, त्याच भाषेत त्याला सांगण्याची आवश्यकता आहे ! |
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin