
कोल्हापूर, २५ ऑक्टोबर (वार्ता.) – कोल्हापूर शहरातील ‘येवलेज मिल्क कॉर्नर’ या दुकानात इंडोनेशिया येथून येणारे आणि ‘हलाल’ प्रमाणपत्र असलेले ‘मेंटॉस’ हे गोळ्यांचे एक उत्पादन विक्री होत असल्याचे हिंदुत्वनिष्ठांच्या लक्षात आले. हे कळताच हिंदुत्वनिष्ठांनी तात्काळ संबंधित दुकानदारांची भेट घेऊन ‘हलाल’ प्रमाणपत्र भारतियांसाठी कशा प्रकारे धोकादायक आहे आणि त्यातून मिळणारा निधी हा जिहादी आतंकवाद्यांसाठी कशा प्रकारे व्यय केला जातो’, हे समजावून सांगितले.
🇮🇳 Kolhapur Update 🚫🍬
After awareness by devout Hindus, ‘Mentos’ (Indonesia-made, Halal certified) products have been removed from shops! 🙌
🗣️ “Nationalist shopkeepers should boycott all Halal products!” – Shivanand Swami, @HinduJagrutiOrg#HalalFreeIndia… pic.twitter.com/lyy1J8mmqT
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 25, 2025
या प्रबोधनानंतर संबंधित दुकानदाराने ‘मेंटॉस’ गोळ्या काढून ठेवत ‘यापुढे ‘हलाल’प्रमाणपत्राच्या कोणत्याही वस्तू विकणार नाही’, असे सांगितले.

या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. सचिन भोसले, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, महेंद्र अहिरे, प्रीतम पवार, विश्वास पाटील यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
राष्ट्रप्रेमी दुकानदारांनी ‘हलाल’ उत्पादनांवर बहिष्कार घालावा ! – शिवानंद स्वामी, हिंदु जनजागृती समिती![]() ‘येवलेज मिल्क कॉर्नर’च्या दुकानदारांचा आदर्श घेऊन अन्य राष्ट्रप्रेमी दुकानदारांनीही त्यांच्या दुकानातील ‘हलाल’ उत्पादनांवर बहिष्कार घातला पाहिजे, असे आवाहन या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांनी केले आहे. |

‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !