
१. ‘पू. संदीप आळशी यांची अकस्मात् भेट झाल्यावर त्यांनी ‘जावेची साधनेची घडी बसवून आलात ना ?’, असे विचारणे
‘१८.४.२०२४ या दिवशी माझ्या दिरांचे निधन झाले. त्यासाठी मी पनवेल येथे गेले होते. मी पनवेल येथे गेल्याचे सनातनचे ११ वे (समष्टी) संत पू. संदीप आळशी (वय ५० वर्षे) यांना ठाऊक होते. १.८.२०२४ या दिवशी पू. संदीप आळशी यांची माझ्याशी अकस्मात् भेट झाली. तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘‘पनवेल येथे जाऊन जावेची (श्रीमती लीना गाडगीळ, वय ६५ वर्षे, माझी मोठी जाऊ) साधनेची घडी बसवून आलात ना ?’’ प्रत्यक्षात मी तसे काहीच केले नव्हते; परंतु माझ्या मनात जावेला साधना सांगण्याच्या संदर्भात केवळ विचार होते. तेव्हा मी केवळ मान हलवून ‘हो’ म्हणाले.
२. जावेला लागलेली सत्संगाची ओढ आणि सनातनच्या पहिल्या संत प.पू. विमल फडकेआजी यांनी केलेल्या संकल्पाची आलेली प्रचीती !
२ अ. जाऊ सनातनच्या ‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी होणे आणि ‘सत्संगातून आनंद मिळत आहे’, असे जावेने सांगणे : मी गोवा येथून जावेला अधूनमधून भ्रमणभाष करत असे. तेव्हा मी तिला सनातनच्या ‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी होण्यास सांगत असे. १३.१०.२०२४ या दिवसापासून माझी जाऊ सनातनच्या ‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी झाली. जावेला सत्संगात सांगितलेली सूत्रे आवडतात. त्यामुळे तिची सत्संगात उपस्थित रहाण्याची ओढ वाढू लागली. सत्संगात सांगितलेली सूत्रे ती कृतीत आणण्याचा प्रयत्न करते. ‘सत्संगातून तिला पुष्कळ आनंद मिळत आहे’, असे ती मला भ्रमणभाष करून सांगते. एकदा जावेने मला सांगितले, ‘‘आजींनीही (सनातनच्या पहिल्या संत प.पू. विमल फडकेआजी यांनीही) मला (जावेला) ‘साधना कर’, असे सांगितले होते. तेव्हा मी त्यांचे ऐकले नाही. आता मी प्रयत्न करते.’’

३. ‘प.पू. डॉक्टरांच्या कृपेने घर विकण्याची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडली’, असा जावेचा भाव असणे
त्यानंतर मी जानेवारी २०२५ मध्ये दिरांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने पनवेल येथे गेले होते. त्या वेळी जावेने तिचे मुंबई येथील रहाते घर विकून पनवेल येथील त्यांच्या दुसर्या निवासस्थानी रहाण्याचा निर्णय घेतला. घर विकण्याची प्रक्रिया चालू असतांना माझी जाऊ मला सांगायची, ‘‘प.पू. डॉक्टर मला साहाय्य करत आहेत. ते सतत माझ्या समवेत आहेत. त्यामुळे मला सर्वकाही शक्य होत आहे.’’ तिचा ‘प.पू. डॉक्टरांच्या कृपेने घर विकण्याची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडली’, असा भाव होता. खरोखरच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच घराच्या विक्रीचे व्यवहार केवळ १५ दिवसांत पूर्ण झाले.
जावेच्या मुंबई येथील घरातील अनावश्यक साहित्य काढून अन्य साहित्याची बांधणी (पॅकिंग) करणे, या सर्व प्रक्रियेत तिला आम्ही कुटुंबियांनी (मी, माझा मुलगा निनाद (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ३८ वर्षे) सून सौ. तनुजा (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ३७ वर्षे) माझी मुलगी सौ. नम्रता दिवेकर आणि जावई श्री. राजेंद्र दिवेकर यांनी) साहाय्य केले. मी २ – ३ दिवस सतत तिच्या समवेत होते. त्या वेळी मी तिला ‘सत्संग आणि सत्सेवा यांचा लाभ कसा होतो’, असे सांगून साधनेचे महत्त्व तिच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. ‘आम्ही सर्वांनी जावेला घर आवरण्यासाठी साहाय्य केले’, याविषयी तिला कृतज्ञता वाटत होती.
४. जावेचे यजमान (कै. मकरंद गाडगीळ, वय ७२ वर्षे) यांचे वर्षश्राद्ध होते. त्या वेळी मी जावेला सर्व कृती करतांना प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणे यांचे महत्त्व सांगितले. तिनेही प्रत्येक कृती करतांना तसे प्रयत्न केले.
५. पनवेल येथील उत्तरदायी साधकांशी भेट घालून देणे आणि जावेच्या सेवेचे नियोजन करून गोव्याला परत येणे
त्यानंतर २ दिवसांनी माझ्या मनात विचार आला, ‘मी आता पुन्हा सेवेसाठी गोव्याला जाणार आहे. त्याआधी जावेची पनवेल येथील उत्तरदायी साधकांशी भेट घालून देऊया, म्हणजे तिची सेवा चालू होईल.’ मी तेथील उत्तरदायी साधकांशी बोलून त्या दोघांच्या भेटीचे नियोजन केले. उत्तरदायी साधकांना सांगून तिच्या सेवेचे नियोजन करून त्यानंतर मी गोव्याला आले.
६. पू. संदीप आळशी यांच्या उद्गारांचे स्मरण होणे
मी रामनाथी आश्रमात आल्यावर मला ‘१.८.२०२४ या दिवशी पू. संदीपदादांनी ‘जावेची घडी बसवून आलात ना ?’, अशी विचारपूस केल्याची आठवण झाली. ‘सनातनच्या संतांनी काढलेले उद्गार, म्हणजे त्यांचा संकल्पच असतो’, याची प्रचीती मला आली. पू. संदीपदादा, मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.
प.पू. डॉक्टर, ‘केवळ आपल्याच कृपेमुळे माझी जाऊही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागली. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’पूर्वी जाऊ दायित्व घेऊन सेवा करू लागली आणि जावेला ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’लाही उपस्थित रहाता आले’, याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.७.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !