अहिल्यानगर येथे कापड बाजारात दुकाने सजली भगव्या ध्वजांनी !

हिंदूंना हिंदु व्यापारी ओळखता येण्यासाठी अभिनव उपक्रम !

दुकाने सजली भगव्या ध्वजांनी

अहिल्यानगर – दिवाळीची खरेदी करतांना हिंदूंना हिंदु व्यापारी सहज ओळखता यावेत, यासाठी येथील कापड बाजार भगव्या ध्वजांनी सजला आहे. काही दिवसांपूर्वी आमदार संग्राम जगताप यांनी ‘हिंदूंनी दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करावी’, असे आवाहन केले होते. त्यानंतर बाजारपेठेतील हिंदु व्यापार्‍यांनी आपल्या दुकानांवर भगवे ध्वज लावून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. कापड बाजार परिसरात आता सर्वत्र भगवे झेंडे फडकत असल्याने कोणते दुकान हिंदूंचे आहे ? हे ओळखणे सोपे झाले आहे.

काही ठिकाणी तर ‘स्वदेशीचा संकल्प हिंदु एकतेला प्राधान्य’, ‘ज्याच्या कपाळी टिळा त्याच्याकडूनच खरेदी करा’, अशा घोषणा दिल्या. हिंदूंना हिंदूंच्या दुकानातून खरेदी करण्यास सोपे जाईल, या उद्देशानेच हे ध्वज लावण्यात आल्याचे सर्व व्यापार्‍यांनी सांगितले.