लिंबाचे महत्त्व सांगण्यासाठी वापर करण्यात आल्याचा दावा
सामाजिक माध्यामांत होत आहे टीका
भुवनेश्वर (ओडिशा) – ओडिशातील प्राथमिक शाळेच्या इयत्ता ५ वीच्या ‘माय इंग्रजी बुक’ या सरकारी पाठ्यपुस्तकातील एका धड्यात अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेते सलमान खान यांची भूमिका असणार्या वर्ष १९९९ मधील ‘हम दिल दे चुके सनम’ या प्रसिद्ध चित्रपटातील ‘निंबुडा निंबुडा’ या गाण्याचे बोल छापण्यात आले आहेत. यात लिंबाचे महत्त्व आणि त्याचे उपयोग सांगण्यात आले आहेत. याचे छायाचित्र सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्यानंतर शिक्षण पद्धतीवर तीव्र टीका होत असून मोठा वाद निर्माण झाला आहे.
हे पाठ्यपुस्तक ओडिशा सरकारच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे संमत करण्यात आलेले आहे. यावर शिक्षण विभागाच्या काही अधिकार्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते, मुलांना मनोरंजक पद्धतीने आणि त्यांच्या ओळखीच्या गोष्टींद्वारे भाषा शिकवण्याचा हा एक प्रयत्न असावा; मात्र वाढता विरोध पाहता या प्रकरणी पुस्तकाचे पुनरावलोकन केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(म्हणे) ‘आजच्या काळामध्ये वैकुंठगमन वगैरे म्हणणे मला पटत नाही, विशिष्ट वर्गाने थोपवलेल्या गोष्टी !’ – शरद पवार
Naira Energy Cuts Prices : पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल ३ रुपयांनी केले स्वस्त
शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या मूर्तीच्या संवर्धनासाठी वज्रलेपन करणार !
गाय हिंदूंसाठी पवित्र : तिच्या हत्येमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात ! : Gujarat High Court
श्री तुळजाभवानी देवीच्या ४ सहस्र एकर भूमीच्या घोटाळ्याची सखोल चौकशी करा !
कोकणातील देवराई भूमी ‘शासन जमा’ करण्याच्या कारवाईची चौकशी करा ! – महसूलमंत्र्यांचे उपसचिवांना निर्देश