
पणजी, २९ जून (पत्रक) – गेली २५ वर्षे गोव्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक कार्य करत असलेल्या आणि शिशुवाटिकांपासून उच्च माध्यमिक विद्यालयापर्यंत ४४ शिक्षणसंस्था चालवत असलेल्या ‘विद्याभारती गोवा’ या सरकारमान्य शैक्षणिक संघटनेच्या २८ जून या दिवशी झालेल्या सर्वसाधारण सभेत मराठी राजभाषा निर्धार समितीच्या कोकणीबरोबरच मराठीलाही राजभाषा करण्याच्या मागणीला पूर्ण पाठिंबा देणारा ठराव सर्व सदस्यांनी दोन्ही हात उंचावून सामूहिक ॐ काराच्या गजरात पारित करण्यात आला.
या वेळी व्यासपिठावर ‘विद्याभारती गोवा’चे अध्यक्ष डॉ. सीताराम कोरगावकर, उपाध्यक्ष (निवृत्त कृषी संचालक) माधव केळकर, ज्येष्ठ मार्गदर्शक पुरुषोत्तम कामत, संघटन सचिव शशांक कामत, कोषाध्यक्ष सूर्यकांत गावस आणि सहसचिव मनोहर पेडणेकर उपस्थित होते.
ठरावाचे वाचन राज्य शिशुवाटिका प्रमुख अधिवक्ता रोशन रवींद्र सामंत यांनी केले. तत्पूर्वी माधव केळकर यांनी मराठीला राजभाषेचे स्थान देण्याच्या मागणीची पार्श्वभूमी सांगितली. पोर्तुगिजांच्या दमनचक्रात मराठी भाषेने हिंदु संस्कृती आणि राष्ट्रीयता यांचे रक्षण केले. आजही या दोन्ही गोष्टी टिकवण्यासाठी मराठी राजभाषा होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !
पावसाचा जोर अल्प असल्याने धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलतेन अल्पच
ग्रामीण भागात २२ लाख लोकांना १ सहस्र २०० टँकरने पाणीपुरवठा !
रामटेकडी ते पुलगेट (पुणे) येथे ८ तास वाहतूककोंडी !
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री करणार्यांवर कारवाई होणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
अल्पवयीन हिंदु मुलींवर अत्याचार करणार्या धर्मांध समीर मणेर याच्यावर गुन्हा नोंद !