
मुंबई, ३० जून (वार्ता.) – नाशिकमध्ये होणार्या आगामी सिंहस्थ कुंभपर्वासाठी सर्व विकासकामे पूर्ण करण्यास सरकार कटिबद्ध आहे. कुंभपर्वाच्या यशासाठी केंद्र आणि राज्य सरकारांसह विविध यंत्रणांद्वारे ३४ सहस्र ७३२.३९ कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे. कुंभपर्वाच्या निमित्ताने स्थापन केलेल्या ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभपर्व प्राधिकरणा’ला कामांमध्ये पालट करण्याचे आणि नवीन कामांचा समावेश करण्याचे अधिकार दिले आहेत. कुंभपर्वासाठी अल्प निधी देणार नाही, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तरात दिली.
वाहतूककोंडी टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचना !
ऑक्टोबर २०२६ पासून कुंभपर्वाचे प्राथमिक कार्यक्रम चालू होणार असल्याने सर्व विकासकामे एकाच वेळी चालू आहेत. यामुळे ३५ रस्त्यांवर दुरुस्तीचे काम चालू असून नागरिक आणि रहिवासी यांना वाहतुकीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. मंत्री सामंत म्हणाले की, नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक वॉर्डनद्वारे वाहतूक नियंत्रित केली जाते. वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण झाल्यास प्रशासनाला कडक नोटीस दिली जाईल. स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याविषयी कुंभपर्व मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली जाईल.
अपक्ष सदस्य सत्यजित तांबे आणि श्री. किशोर दराडे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी उत्तर देतांना मंत्री उदय सामंत म्हणाले की, नाशिक महानगरपािलका क्षेत्रात रस्ते आणि पुलांच्या एकूण ३६ कामांना १४४९.३७ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामांपैकी अनुमाने ४० टक्के काम पूर्ण झाले आहे, तसेच द्वारका सर्कलचे काम (२१४ कोटी रुपये) आणि नाशिक रस्त्याच्या भूसुधारणेचे काम प्रगतीपथावर आहे.
कुंभपर्वासाठी २५ गावांमधील ४०६.१९ हेक्टर भूमी अधिग्रहित करण्याची योजना आहे. ५ जून २०२६ च्या सरकारी निर्णयानुसार, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभपर्व प्राधिकरणाने १९१.२१ एकर भूमीच्या सुधारणेसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. आतापर्यंत ३५.२४ हेक्टर भूमी विकसित करण्यात आली असून त्यासाठी ३५२.५७ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी भूमी विकासासाठी ३ सहस्र ६५९.४७ कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी ३,९५४ कोटी रुपयांचे मोठे प्रावधान करण्यात आले आहे.
Varanasi Masjid Demolition : वाराणसीत दालमंडी रस्ता रुंदीकरण प्रकल्पांतर्गत ५ मशिदी पाडण्यास आरंभ
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
राज्यातील जनगणना पहिल्या टप्प्यातील माहिती संकलन १०० टक्के डिजिटल पद्धतीने पूर्ण ! – मुख्यमंत्री
महाराष्ट्रात अणूऊर्जा प्रकल्पासाठी सामंजस्य करार; मात्र अद्याप जागेची निश्चिती नाही !
मुसलमान युवती आणि तिचा सहकारी यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !
रंगपूर (बांगलादेश) येथील एका हिंदु दुकानदारावर जीवघेणे आक्रमण !