Varanasi Masjid Demolition : वाराणसीत दालमंडी रस्ता रुंदीकरण प्रकल्पांतर्गत ५ मशिदी पाडण्यास आरंभ

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील दालमंडीमध्ये रस्ता रुंदीकरण प्रकल्पाच्या अंतर्गत १ जुलै या दिवशी ५ मशिदी पाडण्याची कारवाई चालू झाली. यामध्ये करीमुल्ला बेग मशीद, निसारन मशीद, अली रझा खान मशीद, संगेमरमर मशीद आणि रंगीले शाह मशीद यांचा समावेश आहे. या कारवाईसाठी दालमंडी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षादलाचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत. याठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. या संपूर्ण कारवाईवर ‘ड्रोन कॅमेर्‍यां’द्वारे लक्ष ठेवले जात आहे.