Naira Energy Cuts Prices : पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल ३ रुपयांनी केले स्वस्त

  • ‘नायरा एनर्जी’ आस्थापनाचा निर्णय

  • अन्य तेल आस्थापनांकडून मूल्यात कपात नाही !

नवी देहली – अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबल्यामुळे परिस्थिती हळूहळू सुरळीत होत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत काहीशी घसरण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतातील खासगी इंधन विक्रेता आस्थापन ‘नायरा एनर्जी’ने पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने पेट्रोलच्या मूल्यात प्रति लिटर ५ रुपये आणि डिझेलच्या मूल्यात प्रति लिटर ३ रुपये कपात केली आहे. इतर तेल आस्थापनांनी म्हणजेच आय.ओ.सी., हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या आस्थापनांनी सध्या तरी पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात कोणतीही कपात केलेली नाही.