
पुणे – प्रतिवर्षी पावसाळ्याच्या आरंभी ‘हिरवाई’ महोत्सवाचे आयोजन केले जाते. निसर्ग, पर्यावरण आणि संस्कृती यांतील परस्परसंबंध दृढ करणे, वनस्पती लागवडीमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढवणे हा महोत्सवाचा उद्देश असतो. या उपक्रमाचे यंदा १८ वे वर्ष असून महोत्सव अंतर्गत ‘जीविधा’ संस्थेच्या वतीने डॉ. हेमा साने स्मृती व्याख्यानमाला आयोजित केली आहे. १ ते ३ जुलै या कालावधीत ही व्याख्यानमाला पार पडेल. यातून पर्यावरण संवर्धनाची जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती ‘जीविधा’ संस्थेचे श्री. राजीव पंडित आणि सौ. वृंदा पंडित यांनी दिली.
म्हात्रे पुलाजवळील इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्कसमोर, राजेंद्रनगर येथे ही व्याख्यानमाला सायंकाळी ६.३० वाजता चालू होणार असून डॉ. मंदार दातार, डॉ. महेश शिंदीकर आणि डॉ. राहुल देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत. ‘याचा लाभ सर्व पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी, अभ्यासक आणि सजग नागरिक यांनी घ्यावा’, असे आवाहन संस्थेने केले आहे.
डॉ. हेमा साने यांची रहाणी साधी, निसर्गाला पूरक आणि पर्यावरण स्नेही होती. त्यांनी वनस्पती संवर्धन आणि भारतीय संस्कृतीवर विपुल लेखन केले. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून त्यांच्या बहुआयामी कार्याची आठवण करून देण्याचा आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न जीविधा संस्था करत आहे. त्यामुळे या व्याख्यानमालेचे आयोजन केले असल्याची माहिती पंडित यांनी दिली.
संपादकीय : पश्चिम घाटाचे रक्षण करा !
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
‘विद्याभारती’ शैक्षणिक संघटनेच्या वतीने मराठी राजभाषेचा ठराव संमत !
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !
ग्रामीण भागात २२ लाख लोकांना १ सहस्र २०० टँकरने पाणीपुरवठा !
PM Modi Appeals No POP : मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा !