१६९ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप

चंडीगड (हरियाणा) – हरियाणा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तत्कालीन सदस्य आणि वरिष्ठ आय.ए.एस्. अधिकारी प्रदीप कुमार यांना ‘सीबीआय’ने ३० जून या दिवशी अटक केली. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून पसार असलेले प्रदीप कुमार हे ३० जून या दिवशीच सेवेतून निवृत्त होणार होते. निवृत्तीच्या दिवशीच ‘आय.ए.एस्.’ अधिकार्याला अटक होण्याची हरियाणातील ही पहिलीच घटना आहे. या घोटाळ्यात अटक झालेले ते तिसरे ‘आय.ए.एस्.’अधिकारी आहेत. प्रदीप कुमार प्रदूषण नियंत्रण मंडळात कार्यरत असतांना त्यांनी त्यांच्या पदाचा अपलाभ उठवून १६९ कोटी रुपयांचा आर्थिक अपहार केल्याचा आरोप आहे. हरियाणा सरकारच्या ८ वेगवेगळ्या विभागांत झालेल्या अनुमाने ५०४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मोठी कारवाई केली आहे.
१. प्रदीप कुमार मंडळाचे गुंतवणूक विषयक सर्व व्यवहार स्वतःच्या पातळीवर पहात होते. त्यांनी ‘मुदत ठेव’ (फिक्स डिपॉझिट) करण्याच्या नावाखाली मर्यादेपेक्षा अधिक रक्कम चंडीगडच्या सेक्टर-३२ मधील ‘आय.डी.एफ्.सी.’ बँकेत पाठवली. हा निधी ज्या खात्यात जमा करण्यात आला, ते खाते उघडण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोणतीही अधिकृत संमती किंवा नोंद विभागाकडे नव्हती. बँकेत प्रत्यक्षात कोणतीही ‘मुदत ठेव’ सिद्ध केलीच गेली नाही. संमतीविना उघडलेल्या या खात्यातून बनावट स्वाक्षर्यांद्वारे पैसे काढून ते वेगवेगळ्या बनावट आस्थापनांमध्ये वळवण्यात आले. यामुळे हरियाणा सरकारची १६९ कोटी रुपयांची हानी झाली.
२.‘सीबीआय’च्या अन्वेषणानुसार हा घोटाळा केवळ प्रदूषण नियंत्रण मंडळापुरता मर्यादित नाही. चंडीगडमधील ‘आय.डी.एफ्.सी.’ बँकेच्या शाखेत हरियाणा सरकारच्या ८ वेगवेगळ्या विभागांचा सुमारे ५०४ कोटी रुपयांचा निधी बनावट मुदत ठेवींच्या नावाखाली लाटण्यात आल्याचे उघड झाले आहे.
Naira Energy Cuts Prices : पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल ३ रुपयांनी केले स्वस्त
शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या मूर्तीच्या संवर्धनासाठी वज्रलेपन करणार !
स्थापनेनंतर १० वर्षांनी ‘महाआयटी’ने विधीमंडळात सादर केला पहिला वार्षिक अहवाल !
श्री तुळजाभवानी देवीच्या ४ सहस्र एकर भूमीच्या घोटाळ्याची सखोल चौकशी करा !
कोकणातील देवराई भूमी ‘शासन जमा’ करण्याच्या कारवाईची चौकशी करा ! – महसूलमंत्र्यांचे उपसचिवांना निर्देश
Sabarimala Gold Probe : शबरीमला सोने प्रकरणात ‘त्रावणकोर देवस्वम बोर्डा’च्या माजी अध्यक्षांच्या विरोधात मिळाले पुरावे !