ठाणे येथे शाळेत प्रवेश देण्यासाठी लाच घेणार्‍या २ खासगी व्यक्ती कह्यात !

प्रातिनिधिक छायाचित्र

ठाणे, ३० जून (वार्ता.) – येथील राबोडी भागातील हॉली क्रॉस कॉन्व्हेंट शाळेमध्ये इयत्ता ६ वीच्या प्रवेशासाठी १ लाख रुपयांची लाच घेतांना फातीमा ताहीर अन्सारी आणि चैतन्य प्रदीप प्रधान या २ खासगी व्यक्तींना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे. (हिंदूंनो, मुलांना लाचखोर ख्रिस्त्यांच्या शाळेत घालायचे का ते ठरवा ! – संपादक) आरोपींनी १०० टक्के शासकीय अनुदानित शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी शाळेच्या शुल्कासह १ लाख रुपयांची मागणी केली होती. २९ जूनला रचलेल्या सापळ्यात तक्रारदाराकडून आधी भरलेले २२ सहस्र ७०० रुपये वगळून उर्वरित ७७ सहस्र ३०० रुपयांची लाच घेतांना आरोपींना कह्यात घेण्यात आले. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.