गाय हिंदूंसाठी पवित्र : तिच्या हत्येमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात ! : Gujarat High Court

मंहमद आरिफ याला जामीन देण्यास गुजरात उच्च न्यायालयाचा नकार !

कर्णावती (गुजरात) – गाय हिंदूंसाठी पवित्र असून तिच्या हत्येमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, असे सांगत गुजरात उच्च न्यायालयाने गोमांसासह पकडलेल्या मंहमद आरिफ नावाच्या आरोपीची जामीन याचिका फेटाळून लावली.

उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ‘आरोपीविरुद्ध यापूर्वीच अशा प्रकारचे ८ गुन्हे नोंद आहेत. मागील प्रकरणांमध्ये जामीन मिळूनही तो वारंवार असे गुन्हे करत आहे. त्यामुळे त्याची सुटका केली जाऊ शकत नाही. गुजरात सरकारने गायीच्या रक्षणासाठी कठोर कायदे केले आहेत. हिंदु धर्मात गाय पवित्र मानली जाते आणि तिची हत्या हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावू शकते.’ यासह न्यायालयाने ‘भारतीय समाजातील एका मोठ्या वर्गासाठी, विशेषतः हिंदु आणि जैन समुदायांसाठी गाय पवित्र आहे आणि ते तिच्या रक्षणाला अत्यंत महत्त्व देतात. या तथ्याकडे न्यायालय दुर्लक्ष करू शकत नाही’, असेही म्हटले.

या घटनेतील आरोपी मंहमद आरिफ याच्या विरोधात डिसेंबर २०२५ मध्ये गोध्रा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. १ डिसेंबर २०२५ या दिवशी गोध्रा पोलिसांनी मंहमद आरिफच्या घरावर धाड घालून २३ किलो गोमांस जप्त केले होते. घटनास्थळावरून त्याला अटक करण्यात आली होती.